गोवा खबर : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची काल शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी त्यांची अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. गोव्यातील राजकारण व काही महत्त्वाच्या विषयांबाबत विश्वजीत राणे यांच्याकडून संतोष यांनी सद्यःस्थिती जाणून घेतली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनिमित्ताने राणे यांच्याकडे सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघ सोपविण्यात आले आहेत. त्याबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे काम राणे यांनी दिल्लीत केले.
गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांची कामगिरी कशी राहिली व सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी कशी होती याबाबतही संतोष यांनी राणे यांच्याकडून माहिती जाणून घेतल्याचे समजते.