गोवा खबर : मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मतदारसंघातील 200 गरजवंतांना चतुर्थीनिमित्त कडधान्याचे वितरण केले.
आरोलकर हे आमदार होण्यापूर्वीपासून ग्रामस्थांना मदतीचा हात देत होते. नुकतेच त्यांनी शेतकर्यांना बी-बियाणे खत वितरित केले. यंदा चतुर्थीला मांद्रेतील विर्नोडा, तुये, पार्से, आगरवाडा, मोरजी, मांद्रे, हरमल, पालये, केरी या पंचायतक्षेत्रांतील 2 हजार ग्रामस्थांना त्यांनी चतुर्थीनिमित्त साहित्याचे वाटप केले.
याविषयी बोलताना आरोलकर म्हणाले, गरजवंतांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मांद्रे उदरगत संस्थेमार्फत अॅड. सिद्धी आरोलकरही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मांद्रे मतदारसंघातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, त्यासाठी सरकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.