Connect with us

गोवा खबर

राज्यपालांहस्ते राजभवनात २७२ कॅन्सर आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राजभवनात सुमारे २७२ कर्करोग आणि डायलिसिस रुग्णांना राज्यपालांच्या निधीतून आर्थिक मदतीचे वितरण केले.
आर्थिक सहाय्य वितरण समारंभात बोलताना पिल्लई यांनी भारतातील लोक हे सर्वोच्च आहेत असे सांगून त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेची सेवा करणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
राज्यपालांनी सैमिक दायज यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल गोव्यातील डोंगराळ आणि जंगल भागात फिरून अशा भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन समझून घेण्यासाठी अभ्यास करणार आहेत अशी माहिती दिली. अशा भागात राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
कर्करोगाचे रुग्ण लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करून पिल्लई यांनी कर्करोग हा आता बरा होणारा रोग आहे आणि रुग्णांनी त्याबद्दल काळजी करू नये असे सांगितले. आर्थिक मदतीसाठी आलेले सर्व अर्ज राजभवनाने मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.
गरजू कर्करोग, डायलिसिस आणि इतर रुग्णांना अशा आर्थिक मदतीचे वितरण करणे ही राजभवनच्यावतीने सुरू केलेली महत्वपूर्ण कामगिरी आहे, असे राज्यपाल म्हणाले.
गोव्याच्या प्रथम महिला रीता श्रीधरन पिल्लई याही यावेळी उपस्थित होत्या. राज्यपालांचे सचिव एमआरएम राव, आयएएस, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संदेश गडकरी यांनी आभार मानले.