Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन गुन्हेगारी कायद्यांवरील कार्यशाळेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेतर्फे एला फार्म, ओल्ड गोवा येथे अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी आयोजित भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय शिक्षा अधिनियम या कार्यशाळेचे उद्घाटन केले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि समकालीन सामाजिक गरजांनुसार नवीन गुन्हेगारी कायद्याच्या भूमिकेवर भर दिला.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी सादर केलेल्या योजनांचे कौतुक करताना त्यांनी समान नागरी संहितेसारख्या गोव्याच्या प्रगतीशील हालचालींचा उल्लेख करून २०४७ पर्यंत विकसित गोवा साध्य करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल यांनी प्रशिक्षणाची प्रशंसा केली आणि कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती म्हणून सीबीआयचे माजी विशेष संचालक धरमचंद जैन, आयपीएस यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

अखिल भारतीय सेवा अधिकारी,पोलीस महासंचालक आलोक कुमार, आयपीएस या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले. वासुदेव शेट्ये यांनी आभार मानले.