Connect with us

गोवा खबर

रोहन तांबोस्कर, कृष्णा पालयेकर यांचा गौरव

Published

on

गोवा विद्यापीठात उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल रोहन तांबोस्कर, कृष्णा पालयेकर यांच्या सत्कारप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर, सुबोध महाले, रमेश सावळ, सूर्यकांत तोरस्कर, उमेश तळवणेकर, सौ. तांबोसकर.
Spread the love
गोवा खबर : मराठी विषयात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात गोवा विद्यापीठात प्रथम आलेल्या व उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल रोहन तांबोस्कर व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात गोवा विद्यापीठातून मराठी विषयात द्वितीय आलेल्या कृष्णा अरुण पालयेकर यांचा आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यातर्फे गौरव केला.
हे यश संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. इतरही विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडाक्षेत्रात असेच यश संपादन करून त्यांच्यासारखा विविध क्षेत्रात लौकिक वाढवावा, असे आवाहन आर्लेकर यांनी केले.
यावेळी तांबोसे-मोप- उगवे सरपंच सुबोध महाले, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी जि. पं. सदस्य सूर्यकांत तोरस्कर, उमेश तळवणेकर, रोहन यांची आई आदी यावेळी उपस्थित होते.
सुबोध महाले यांनी रोहन तांबोसकर आणि कृष्णा पालयेकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल कौतुक केले.