Connect with us

गोवा खबर

वेदांता सेसा गोवाद्वारे स्वातंत्र्यदिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : वेदांता सेसा गोवाने भारत आणि लायबेरियामधील त्यांच्या सर्व ठिकाणी, ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा केला. सेसा गोवा सिक्युरिटीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि कर्मचारी तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाचा यात सक्रिय सहभाग होता.

पणजी येथील मुख्य कार्यालयात सेसा गोवाचे सीईओ, नवीन जाजू यांनी राष्ट्रध्वज फडकावून कार्यक्रमाचे नेतृत्व केले. जाजू म्हणाले, आम्ही स्वातंत्र्याचे ७८वे वर्ष साजरे करत असताना, मी आपल्या देशाच्या शूरवीरांकडून खूप प्रेरित झालो आहे. आमच्या वीरांची समुदायालापरत देण्याच्याप्रती असलेली निस्वार्थ वचनबद्धता, आमचा पुढचा मार्ग उजळवते आणि आम्हाला प्रोत्साहन देते. यातूनगर्व से, वेदांता फॉर इंडियाया आमच्या मिशनचा आम्हाला अभिमान वाटतो. आज आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि आपला सामायिक प्रवास साजरा करूया. आपले यश, आपली आव्हाने आपण एकत्रितपणे उभारत असलेले उज्ज्वल भविष्य अनुभवूया.

हा दिवस भारतातील गोवा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि लायबेरियातील बोमी काउंटीमध्ये समान उत्साहाने साजरा करण्यात आला, जिथे कंपनी वेस्टर्न क्लस्टर लिमिटेडच्या माध्यमातून काम करते

स्वातंत्र्य दिनाच्या समारंभापर्यंत, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, गोड पक्वान्न बनवणे आणि मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, यासह अनेक आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांनी उत्साहात भर घातली तसेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आपुलकी देखील वाढवली. या स्पर्धेतील विजेत्यांचा सोहळ्या दरम्यान वरिष्ठ व्यवस्थापन संघाच्या हस्ते, सन्मान करण्यात आला.

या उत्सवी कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजवणाऱ्या  सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचाही समावेश होता. त्यांचे संस्थेशी असलेले समर्पण आणि बांधिलकी मान्य करून, त्यांना सन्मानित करण्यात आले

भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच ती देशाच्या विकासात योगदान देण्याच्या आणि #ViksitBharat च्या लक्ष्याची जाणीव करून देण्यासाठी समर्पित आहे.