गोवा खबर : वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार देविया राणे यांच्या हस्ते दूधसागर मॉन्सून ट्रेकिंगसाठी नोंदणीकरिता अधिकृत वेबसाइट सुरू करण्यात आली. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर यावेळी उपस्थित होते.
गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोवा वन विकास महामंडळ यांच्या संयुक्त दूधसागर येथे मान्सून ट्रेकिंगचा हंगाम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी
www.dudhsagartrekking.com ही वेबसाइट सुरू करण्याता आली आहे. त्याचा उद्दिष्ट संपूर्ण प्रक्रिया नियमित आणि सुव्यवस्थित करण्याचा आहे. ज्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना एका क्लिकवर ऑनलाइन बुकिंग करता येईल, असे आमदार राणे म्हणाल्या.
ट्रेकर्स आता आरएफओ (रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स) आणि प्रमाणित मार्गदर्शकांसह त्यांचे बुकिंग सुरक्षित करू शकतात व सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतात. प्रत्येक ट्रेक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आमच्या जंगलांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवत एक अविस्मरणीय अनुभव देणारे आहे, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे, असेही दिव्या म्हणाल्या. चेंजिंग रूम, टॉयलेट आणि कॅन्टीन यासारख्या अतिरिक्त सुविधा देखील उपलब्ध केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.