गोवा खबर : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या स्ट्रीट प्रोव्हिडन्स ट्रस्ट- गोवा या एनजीओच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविला.
केरळच्या जनतेला मदतीचे आश्वासन देताना राज्यपालांनी भूस्खलनाची आपत्ती ही सामान्य नव्हती, असे सांगून भूस्खलनग्रस्तांसाठी शक्य ती सर्व मदत आणि सर्व सहकार्य केले जाईल आणि आम्ही वायनाडच्या लोकांच्या पाठीशी उभे राहू असेही ते म्हणाले.
सुरवातीस पिलर महाविध्यालयाचे प्राचार्य फा. फ्रेडरिक रॉड्रिग्स यांनी मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनाला आशीर्वाद दिले.
राज्यपालांचे सचिव एमआरएम राव, आयएएस, बॉस्को जॉर्ज आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.