हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवेदन सुपुर्द
गोवा खबर: बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करणारे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने १२ ऑगस्ट या दिवशी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. पुंडलिक खोर्जुवेकर यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘सनातन रक्षा दल’चे उत्तर गोव्याचे अध्यक्ष सर्वश्री संजय गावडे, ‘केसरिया हिंदू वाहिनी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव झा, ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’चे गोवा विभागाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, ‘करणी सेने’चे गोवा विभागाचे अध्यक्ष संतोष राजपूत आणि हिंदु जनजागृती समितीचे सुशांत दळवी यांचा सहभाग होता.
याविषयी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने १० ऑगस्ट या दिवशी पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने केली होती आणि या निदर्शनात करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येत आहे.