गोवा खबर:गोवा विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर यांनी स्थानिक लोकांची संस्कृती हे संशोधन आणि अभ्यासाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे असे प्रतिपादन मिनेझिस ब्रागांझा संस्थेत आयोजित केलेल्या जागतिक आदिवासी दिन समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री तवडकर, यांनी जर आपण आपल्या विशाल अशा आदिवासी ज्ञानावर लक्ष केंद्रित केले तर आपण ते आपले सामर्थ्य बनवू असे ते म्हणाले. स्थानिक लोकांची संस्कृतीचे जतन व अभ्यास करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आदिवासी समाजाच्या पारंपारिक कृषी ज्ञानाचे उदाहरण दिले आणि सांगितले की हा अगदी शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि या ज्ञानात मोलाची भर घालण्याचे मार्ग शोधले तर त्याचा समाजासाठी मोठा फायदा होऊ शकतो असे ते म्हणाले.
गोव्यातील अनुसूचित जमातीच्या विकासासाठी काम करणाऱ्यांचे मंत्री महोदयांनी कौतुक केले.
यानिमित्ताने उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्य लढ्यात आणि आदिवासी हक्क’ जीवन आणि योगदान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय आणि व्यावसायिक अभ्यास संस्था, हरमल यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. सेंट अँड्र्यू उच्च माध्यमिक वाडे, वास्को यांना व्दितीय पारितोषिक विजेते म्हणून घोषित करण्यात आले तर तिसरे स्थान सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक, म्हापसा यांना मिळाले.
पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक श्री मडगाव उच्च माध्यमिक यांना, तर दुसरे उत्तेजनार्थ पारितोषिक श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक शाळा, काणकोण यांना देण्यात आले. तिसरा उत्तेजनार्थ पुरस्कार डॉ केबी हेडगेवार उच्च माध्यमिक शाळा, कुर्टी, फोंडा यांना मिळाला. श्री नागेश सरदेसाई हे प्रश्नमंजुषा मास्टर होते.
सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिक्षण संचालक श्री शैलेश सिनाय झिंगडे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि महान भारतीय आदिवासी नेते आणि कार्यकर्ते, भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचा प्रचार करण्यासाठी हे एक अभिनव माध्यम आहे असे सांगितले.
आदिवासी लोकांची संस्कृती आणि योगदानाची दखल म्हणून ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन पाळला जातो.
सुरवातीस कामगार आणि रोजगार आयुक्त श्री लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना युवक हे राष्ट्राचे भविष्य असल्याचे सांगून त्यांनी तरुणांना त्यांना हवा असलेला बदल तेच होऊ शकतात आणि सर्वांनीच जिद्द आणि आत्मविश्वास बाळगला तर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचे योग्य दिशेने समुपदेशन करण्यासाठी सक्रिय राहण्यास सांगितले.
यावेळी गोवा अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री दीपक करमळकर, आदिवासी कल्याण संचालक आणि गोवा आयोगाचे अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे सचिव/सीईओ श्री दशरथ रेडकर, कला आणि संस्कृती संचालक श्री सगुण वेळीप, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक श्री. श्री अरविंद खुटकर आदी उपस्थित होते.