Connect with us

गोवा खबर

निवासी/ओळख असल्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड वापरण्याचे बंद करण्याचे आदेश

Published

on

Spread the love

 गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने धान्य वितरणासाठी जारी केलेल्या शिधापत्रिकांचा निवासी/ओळख पुरावा म्हणून वापरण्याचे बंद करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

सर्व सरकारी खाते/महामंडळे/इतर सरकारी संस्थांना विनंती आहे की त्यांनी निवास/ओळख पटविण्याचा पुरावा म्हणून रेशनकार्डचा आग्रह धरणे थांबवावे आणि योजना/सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्यासाठी पुरावा म्हणून शिधापत्रिका स्वीकारण्याची अट रद्द करावी.