Connect with us

गोवा खबर

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिश्यवृत्ती आणि विद्यावेतन योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर:दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण संचालनालयाच्यावतीने गोव्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांस विद्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण संचालनालया च्यावतीने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

पहिली ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यास दरमहा २००/- रूपयेप्रमाणे ११ महिन्यासाठी विद्यावेतन देण्यात येते. इयत्ता  ९ वी ते १२ वी किंवा विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार तत्सम इयत्तेच्या डे-स्कॉलर विद्यार्थ्यांस दरमहा ५००/- रूपये, हॉस्टेलांत राहणाऱ्यास दरमहा २००/- रूपयेप्रमाणे ११ महिन्यासाठी शिष्यवृत्ती आणि अंध विद्यार्थ्यांस दरमहा ७५/- रूपयाप्रमाणे ११ महिन्यासाठी रिडर भत्ता देण्यात येतो.

बी. ए., बी.कॉम., बी. एससी., अशा इयत्तेच्या डे-स्कॉलर विद्यार्थ्यांस दरमहा ६५०/- रूपये, हॉस्टेलांत राहणाऱ्यास दरमहा २७०-/- रूपये याप्रमाणे ११ महिन्यांसाठी शिष्यवृत्ती आणि अंध विद्यार्थ्यांस दरमहा ११५/- रूपयांप्रमाणे ११ महिन्यांसाठी रिडर भत्ता देण्यात येतो.

बी. ई,. बी. आर्क., एमबीबीएस., एलएलबी., बी. एड., व्यावसायिक पदविका, अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि एमए, एमएससी, एम. कॉम., एलएलएम, एम. एडच्या डे-स्कॉलर विद्यार्थ्यांस दरमहा ९००/- रूपये, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यास दरमहा ३६०/- रूपये प्रमाणे ११ महिन्यासाठी शिष्यवृत्ती आणि अंध विद्यार्थ्यांस दरमहा १५०/- रूपये  याप्रमाणे ११ महिन्यासाठी रिडर भत्ता देण्यात येतो.

वैध्यकीय मंडळाच्या दाखल्याप्रमाणे कमीत कमी ४० टक्के आणि त्यापेक्षा जास्त टक्के दिव्यांग असलेल्या, पहिल्या वार्षिक परिक्षेत कमीत कमी ४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गूण मिळविलेल्या, पालकांचे वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- रूपयापेक्षा जास्त नसलेल्या आणि समाज कल्याण खात्याचे ओळखपत्र असलेले विद्यार्थीं या योजनेस पात्र आहेत. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापिठातून संगीत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासही शिष्यवृत्ती देण्यात येते.

विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती आणि विद्यावेतनाचे अर्ज  दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण संचालनालयाच्या कार्यालयात १ ऑगस्ट पासून उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज संबंधित शाळा, महाविद्यालये, संस्थां प्रमुखांच्या शिफारशीसह ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत संचालनालयाच्या कार्यालयात सुपूर्द केले पाहिजे.

अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या फोन. क्र. ०८३२-२९१२६०१ वर संपर्क करावा किंवा  dir-depwd@goa.gov.in  या ई-मेलवर भेट द्यावी.