Connect with us

गोवा खबर

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभ

Published

on

Spread the love

                                                                                 

 गोवा खबर:गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. सकाळी ९.१५ वाजता जुन्या सचिवालयासमोर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री संचलनाची पाहणी करतील. महसूल मंत्री श्री. आतानासियो मोन्सेरातमुख्य सचिवपोलिस महासंचालक आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

तसेच स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ विविध तालुका मुख्यालयात मान्यवरांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता संपन्न होणार आहे. पर्यटन मंत्री श्री. रोहन खवंटेम्हापसा येथे ध्वजारोहण करतीलमयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट डिचोली येथे ध्वजारोहण करतीलफोंडा येथे कृषी मंत्री श्री.रवी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होईलडव्ल्युआरडी मंत्री श्री. सुभाष शिरोडकर काणकोण येथे ध्वजारोहण करतीलवाहतूक मंत्री श्री. माविन गुदिन्हो चिखली येथे ध्वजारोहण करणार आहेत. मडगाव येथे कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

पेडणे येथे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. आमदार देविया राणेवाळपई येथे ध्वजारोहण करतीलसमाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाईकेपे येथे ध्वजारोहण करतीलआमदार श्री. गणेश गांवकर धारबांदोरा येथे ध्वजारोहण करतील. क्रीडा मंत्री श्री. गोविंद गावडे सांगे येथे ध्वजारोहण करतील.