Connect with us

गोवा खबर

गोवा उच्च न्यायालयातील उपटपाल कार्यालयाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय टपाल सेवेच्या गोवा टपाल विभागाने शनिवार, 3 रोजी पर्वरी  येथे मुंबई उच्च न्यायालयात उपटपाल कार्यालय उघडले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे  न्यायमूर्ती भारत देशपांडे आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस उपस्थित होते.

या कार्यक्रमात उच्च न्यायालयातील उपटपाल कार्यालयाच्या ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यांच्या पासबुकचे वाटप करण्यात आले.

गोवा विभागाच्या पणजी टपाल सेवा संचालक रमेश पाटील देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. हे नवीन उपटपाल कार्यालय उच्च न्यायालयातील कर्मचारी, कायदे व्यवसायी आणि जनतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या टपाल सेवांची सर्वसमावेशक मालिका प्रदान करेल, असे पाटील यांनी सांगितले.

उद्घाटनाला सोहळ्याला टपाल सेवेच्या गोवा विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल. एन राव यांच्यासह गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई, वरिष्ठ वकील तसेच उच्च न्यायालय बार असोसिएशनचे गोवा विभागाचे अध्यक्ष  जे. कोएल्हो परेरा, केंद्र सरकारचे स्थायी वकील (CGSC)  रविराज चोडणकर  तसेच उच्च न्यायालय आणि टपाल विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.