Connect with us

गोवा खबर

मोरजीतील ‘त्या’ पुलाचे काम चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्याचा आरोलकर यांचा संकल्प

Published

on

मोरजी-पंडीर येथे उभारण्यात येणार मिनी पूल.
Spread the love

गोवा खबर : मोरजी पंचायत क्षेत्रातील पंडीर या ठिकाणी पुलाचे काम जोरदार सुरू आहे. चतुर्थीपूर्वी हा पूल जनतेसाठी खुला करण्याचा संकल्प आमदार जीत आरोलकर यांनी सोडला आहे.

पंडीर येथे एक जुना मिनी पूल होता. तो गेल्या पावसाळ्यात खचला असल्याने या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. आरोलकर यांनी सरकारदरबारी प्रयत्न करून या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा नवीन पूल उभारण्यासाठी प्रयत्न केले. तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी फाउंडेशन घालून कामाला सुरुवात केली. सध्या या ओहोळावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पुलाला काँक्रिट घातलेले नाही. इतर कामे पूर्ण झाली आहेत. पाऊस ओसरला की काँक्रिट घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तशा सूचना कंत्राटदाराला दिल्या असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

या पुलासाठी स्थानिक सरपंच मुकेश गडेकर, पंचायत मंडळ व स्थानिक पंचसदस्याने प्रयत्न केले होते. सुरुवातीला पंचायत निधीतून पूल उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु गटविकास कार्यालयाकडून काही आक्षेप हरकत आल्यामुळे हे काम पंचायतीच्या निधीतून करण्यास मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून सरकारच्या निधीतून या पुलाची प्रक्रिया सुरू केली.