Connect with us

गोवा खबर

मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे, आमच्या नेमबाजांचा अभिमान वाटतो! #Olympics मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांचे अभिनंदन. या दोघांनी उत्तम कौशल्य आणि संघ भावनेचे प्रदर्शन केले आहे.  भारताला अत्यंत आनंद झाला आहे. मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे तिची सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवते.