गोवा खबर : भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपराष्ट्रपतींनी एक्स पोस्टमध्ये, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले असून त्यांच्या या यशातून देशातल्या तरुणांना प्रेरणा मिळेल असे म्हटले आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवण्याच्या अद्वितीय कामगिरीचीही उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली आहे, जी कोणत्याही भारतीयाची ऑलिम्पिकमधली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.