गोवा खबर : गोवा कोकणी अकादमी पणजीच्या शेणय गोंयबाब सभागृहात २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता उगत्या मळबाचे बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. उगत्या मळबाचे अध्यक्ष विवेक पिसुर्लेकर, कविसंमेलनाचे अध्यक्ष दर्शन लोलयेकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निलबा खांडेकर, ज्येष्ठ कवी जॉन आगियार आणि अनघ कामत व्यासपीठावर उपस्थित होते.
अनघा कामत यांनी उपस्थितांचे स्वागत करून कवी संमेलनाची सुरुवात केली. कवी संमेलनाच्या अध्यक्ष दर्शन लोलयेणकर यांनी त्यांच्या मन माझे उगते मळब आणि मन माझे अडगळीची खोली या कवितांमधून मानवी मनाचे सुंदर चित्र मांडले. जॉन आगियार यांनीही आपल्या समर्पित कविता सादरीकरणात टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांची मने जिंकली.
पावसाच्या कविता म्हणून अकरा जणांनी एकमेकांना भिजवले. विवेक पिसुर्लेकर यांनी सर्व कवींनी दरवर्षीप्रमाणे संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अनघा कामत यांनी सूत्रसंचालन केले.

सुनीता पेडणेकर, नूतन दाभोळकर, संगीता म्हापणे, सोनिया शहा, पुष्पा नाईक, सुभाष शहा, दर्शन लोलयेकर, उदय देशप्रभू, जॉन आगियार, नामदेव सुर्लीकर, निलबा खांडेकर, अनघा कामत, विवेक पिसुर्लेकर आणि दामोदर घाणेकर आदी उपस्थित होते.
आषाढ महिन्याचे आणि पावसाळ्याचे औचित्य साधून कवींनी पावसावर विविध कविता सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. काही कवींनी उत्स्फूर्तपणे कविता गायल्या आणि सादर केल्या.