Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेचा नदी विसर्जन अभ्यास 14 पासून

Published

on

Spread the love

गोवा खबर : दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या वतीने जुलै महिन्यात नदीच्या विसर्जनाचा अभ्यास करण्यात येणार आहे. 14 आणि 25 जुलै रोजी तेरेखोल नदीत केरी येथे आरोंदा पुलाखालच्या भागात, 15 आणि 24 जुलै रोजी जुवारी नदीत बोरी पुलाच्या खालच्या नदीच्या भागात, 15 आणि 24 जुलै शापोरा नदीत कोलवाळ येथे कोळवाळ-धारगळ पुलाच्या वरच्या भागात आणि 16 आणि 23 जुलै रोजी मांडवी नदीत मच्छिमारी जेटी पणजी येथे नदीच्या पाण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

वरील नदीतून वाहतूक करणार्‍या सर्व बार्जेंस, प्रवासी लाँची, क्रुईज बोटी, जलक्रिडा बोटी, लहान होडी, फेरीबोटी, मच्छिमारी बोटी आणि इतर यांत्रिकीं आणि बिनयांत्रिकी नाविकांनी वरील दिवसांनी खबरदारी घेऊन सावकाश वाहतूक करावी तसेच गस्त बोटीकडून मिळणार्‍या सूचनांचे पालन करावे, असे बंदर कप्तान खात्याने कळवले आहे.