गोवा खबर : कुंकळ्ळी बंडाच्या नायकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 15 जुलै रोजी नायक हुतात्मा दिवस पाळण्यात येणार आहे. कुंकळ्ळी येथील नायक हुतात्मा स्मारकाजवळ सकाळी होणार्या कार्यक्रमात कुंकळ्ळी बंडाच्या नायकांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
15 जुलै 1583 रोजी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध गोमंतकीयांनी केलेल्या बंडाच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी 15 जुलै रोजी नायक हुतात्मा दिवस पाळण्यात येतो.
समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, आमदार आदी सकाळी 9 वाजता नायक हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहणार आहेत.