Connect with us

गोवा खबर

बाणावली झेडपी पोटनिवडणूक: आपकडून केळशीमध्ये घरोघरी प्रचाराला सुरू

Published

on

Spread the love
आप उमेदवार जोसेफ पिमेंता यांना उदंड प्रतिसाद
गोवा खबर:बाणावली इंडिया आघाडीचे उमेदवार जोसेफ पिमेंता यांनी आम आदमी पार्टीचे (आप) स्वयंसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत,  येत्या 23 जून रोजी होणाऱ्या बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पिमेंता यांनी केळशीमध्ये शुक्रवारी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली असून आपच्या या मोहिमेला केळशीमधील लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 
संसदीय निवडणुकीचा उत्साह पुढे चालू ठेवत, इंडिया आघाडीने पुन्हा एकदा राज्यातील सर्व पक्षांमध्ये ऐक्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वांना पिमेंताला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
“लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे एकजुटीने लढा दिला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरिआतो फर्नांडिस यांना दक्षिण गोव्यात विजयी केले ते उल्लेखनीय होते. त्याचप्रमाणे मला पाठिंबा द्या आणि मला संधी द्या”, अशी विनंती पिमेंता यांनी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीच्या शक्तीवर भर देत म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणुकीत एकजूट दाखवली होती. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आम्ही  संघटित झालो तर गोमंतकीयांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवून आणता येईल”.
आपचे बाणावली आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते बाणावलीवासियांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांचा “बाणावली मॉडेल” त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. आपच्या मोहल्ला क्लिनिक मॉडेलच्या अनुषंगाने व्हिजन क्लिनिकची स्थापना, करिअरशी संबंधित कार्यशाळा, आणि बाणावलीवासियांचे विधानसभा अधिवेशनांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत, त्यांनी खूप परिश्रम घेतले आहे. त्यामुळे अशा खऱ्या परिवर्तनासाठी मतदान करण्याची वेळ आली आहे. आपच्या “बाणावली मॉडेल” ला जाणून मत द्या.  बाणावलीची प्रगती आणि उन्नतीसाठी मतदान करा, असे आवाहन आप कार्यकर्त्यांनी दिले.