गोवा खबर:पेडणे मतदार संघातून आज पर्यंत अपेक्षित विकास झाला नाही. जनतेने या मतदार संघातून नवीन आमदाराला संधी दिली. परंतु या आमदाराने आज पर्यंत आपल्या कारकिर्दीत एक तरी प्रकल्प पेडणे मतदार संघात उभा केला आहे का? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी करून जे प्रकल्प आपण आणले होते, त्या प्रकल्पात तरी कार्यवाही करून त्या त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार व्यवसाय नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी का प्रयत्न केले नाही? असा सवाल उपस्थित करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण पेडणे मतदार संघातूनच निवडणूक लढवणार असा पुनरुच्चार करून लोकांची तशी मागणी असल्याचा दावा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला.
पेडणतील क्रीडा प्रेमींनी गरज ओळखून येथील युवकाचा क्रीडा क्षेत्रात विकास व्हावा, त्यानी नवनवीन संधीचा फायदा घेउन पेडण्याचे नाव उंच न्यावे, यासाठी सुमारे बत्तीस करोड रुपये खर्चून आपण सावळवाडा येथे स्टेडियम बांधले. मात्र क्रीडा खात्याने ते स्टेडियम जी एम आर कंपनीला भाड्याने देऊन पेडणे करावर अन्याय केला.
पेडण्यात क्रीडा क्षेत्रात बरेच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्षीतीजावर झळकत असुन सरकारने आतातरी हे स्टेडियम खेळाडू साठी खुले करावे .असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा पेडणेचे माजी आमदार बाबु आजगावकर यांनी केले आहे.
पेडणे भीरोडे येथील आंतरराष्ट्रीय शरीष्ठौव स्पर्धेत भारताला कान्स पदक मिळवून देणार्या गौरेश कीनळेकर यांचा पेडणे नागरीकांच्या वतीने आयोजित केलेल्या गौरव समारंभात ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर जील्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, माजी उपनगराध्यक्ष, उपेंद्र देशप्रभु वारखंड च्या माजी सरपंच पल्लवी परब , तोरसेकर माजी सरपंच बबन डीसौजा, वीरनोडा चे माजी सरपंच भरत गावडे, इब्रामपूर चे माजी सरपंच राजाराम परब, वारखंडचे माजी सरपंच प्रदीप काबळी, आबा तळकटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदिप पटेकर, रामा सावळ देसाई , आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यानी पुढे सांगितले की पेडणे तालुक्यातील लोकानी मला घडविले आहे. कुठल्याही पक्षाने नव्हे. पेडण्याचा विकास मी प्रामाणिक पणे केला आहे. मी येण्या पुर्वी अनेक गैरसोयी होत्या. त्या मी तुम्हांला केल्या आहेत. नोकऱ्यांच्या रुपाने कुटुंबाना सधन केले .अनेकाना उच्च पदाचे अधीकारी बनवले. जो पेडणे नोकर् यांसाठी वळवळत होता. त्या पेडणे ला नोकरी देणारा बनवला मोपा विमानतळ आयुष हाँस्पीटल सारखे मोठे प्रकल्प आणले ,अपेक्षा होती की या प्रकल्पात पेडणे तालुक्यातील सगळे युवक नोकरी करतील, व उरलेल्या नोकर्या ईतरैना देतील परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षामुळे पेडणे ची उपेक्षा झाली .
गौरेश कीनळेकर यानी आपल्या भाषणात सांगितले की आपण या स्पर्धेत यशस्वी झालो ते माझ्या पेडणे तील सहकारी मीत्र यांच्या संस्कारा मुळे अजुनही मला खुप काम करायचे आहे मी खुप मेहनत घेऊन जागतीक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळविण्यासाठी लढत न काही व सगळे करताना माझ्या पेडण्या बदल आदरच बाळगेन
युवकांनी आपल्या जीवनाचे एक ध्येय निश्चित करून त्या दिशेनें प्रयत्न करायला हवे. मेहनत घ्यायला हवी यश मिळविण्यासाठी नव्हे स्पर्धेत साठी जगावे. असे सांगून युनानी व्यसनाच्या नादिलागु नये व्यसनाचे आपण काहीही मिळवणार नाही. उलट सगळेच गमानवणार व्यसना पासुन दुर राहण्याचे आवाहन त्यानी केले .
या कार्यक्रमात पटेकर, मनोहर धारगळकर, जगन्नाथ देसाई आदिवासी आपले विचार मांडले.
गौरेश कीनळेकर यांचा शाल श्री फळ स्मृती चिन्ह पुष्पगुच्छ देउन बाबु आजगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सुभाष सावंत यानी सूत्र निवेदन व आभार प्रदर्शन केले