Connect with us

गोवा खबर

आमदार नसलो तरी माझा पाठिंबा भाजपा आणि पर्यायाने पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनाच:मिलिंद नाईक

Published

on

Spread the love
गोवा खबर:मुरगाव मतदारसंघात माझा पराभव झाला असल्याने लोकसभेसाठी माझा पाठिंबा कोणाला आहे, अशी शंका मतदारांच्या मनात उपस्थित होऊ शकते. परंतु, मी आमदार नसलो तरी माझा पाठिंबा भाजपा आणि पर्यायाने पंतप्रधान पदाचे दावेदार श्री. नरेंद्र मोदी यांनाच असेल. माझ्यासोबत सर्व नगरसेवक व कार्यकर्ते आहेत, असे स्पष्टीकरण मुरगावचे माजी आमदार श्री. मिलिंद नाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिले.
मुरगाव मतदारसंघात प्रचारासाठी येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपाच्या दक्षिण गोवा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी कळवले होते. पण, आम्ही सर्वजण भाजपासोबत आहोत, हे त्यांना कळवले होते. आम्हाला केंद्रात भाजपाचे सरकार हवे आहे तर पंतप्रधान पदी श्री. नरेंद्र मोदी पाहिजे आहेत, असे श्री. मिलिंद नाईक म्हणाले.
भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कट्टर कार्यकर्ता असतो. यामुळे तो आमदारासोबत असो किंवा माजी आमदारासोबत असो, तो भाजपालाच मत देणार आहे, असा विश्वास श्री. मिलिंद नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत रामचंद्र कामत, शशी परब, दामोदर नाईक, प्रजल मयेकर, लिओ रॉड्रिगीस, मंजुषा पिळर्णकर, सोनाली पार्सेकर आदी उपस्थित होते.