Connect with us

गोवा खबर

हेवेदावे विसरून भाजपाच्या दक्षिण गोवा मतदार संघाच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे:कवळेकर

Published

on

Spread the love
गोवा खबर:केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून केपे सारख्या भागात विविध प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला हक्काचा खासदार आवश्यक आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक असलेला आणि येथील समस्या त्यांच्यापुढे मांडण्यासाठी सक्षम असलेला असा खासदार गरजेचा आहे. यासाठी आम्ही सर्वांनी हेवेदावे विसरून भाजपाच्या दक्षिण गोवा मतदार संघाच्या उमेदवार सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. केपे मतदार संघातून भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी मिळवून दिली पाहिजे, असे आवाहन माजी  उप मुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केले.
भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी केपे मतदार संघात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उप मुख्यमंत्री बाबू कवळेकर, सौ. सावित्री कवळेकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष कुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, संजना वेळीप, दीपक बोरकर, सरपंच भूपेंद्र गावस देसाई, पंच विन्सेंट डायस, इमॅक्युलेट फर्नांडिस, सिद्धार्थ कालेकर, संतोष प्रभुदेसाई तसेच मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, माजी सरपंच आलेलुईया आफोंसो, सरिता नाईक, माजी नगराध्यक्ष नाना गावकर, भाजप कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी भाजपाला मतदान करावे असे आवाहन दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी केले. दक्षिण गोव्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे, सच्च्या दिलाने प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी सौ. धेंपो यांनी दिले. जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे केंद्र उपलब्ध व्हावे या हेतूने निवडून आल्यानंतर दक्षिण गोव्यात स्वतंत्र कार्यालय खुले केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केपे मतदार संघातील प्रचार दौऱ्याची सुरुवात अवडे येथील मिनी मार्केटमधील सभेने करण्यात आली. यानंतर सौ. धेंपो यांनी कट्टा आमोणा जंक्शन, श्री पाईक देव सभागृह पाड्डा, शिरवळ या ठिकाणी जनतेला संबोधित केले.  दुपारनंतर नवे खोला, श्री आदिनाथ सभागृह माटवे खोला, श्री विठ्ठल रखुमाई सभागृह साळेरी, श्री महादेव मंदिर बार्से तसेच श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोरपिर्ला येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. केपे मतदार संघातील प्रचार दौऱ्यावेळी सौ. धेंपो यांना जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला.