Connect with us

गोवा खबर

मतदार विकसित भारतासाठी मतदान करणार असल्याने पल्लवी धेंपो यांना भिवपाची गरज ना:मुख्यमंत्री

Published

on

Spread the love
गोवा खबर: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गोव्यात अनेक साधनसुविधा प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत जनता विकसित भारतासाठी मतदान करणार आहे. यामुळे भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी  धेंपो यांना ‘भिवपाची गरज ना’, असे उद्गार मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काढले. भाजपाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री श्री. रवी नाईक, मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, मंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा यांची उपस्थिती होती.
अर्ज सादर करण्यापूर्वी भाजपाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित हितचिंतकांनी सौ. धेंपो यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपा कार्यालयाजवळ हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अबकी बार 400 पार, पल्लवी धेंपो तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
भाजपाचे गोवा प्रभारी श्री. आशिष सूद, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्री. नरेंद्र सावईकर, सभापती श्री. रमेश तवडकर, भाजपचे मंत्री श्री. माॅविन गुदिन्हो, मंत्री श्री. सुभाष फळदेसाई, मंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा, मंत्री श्री. सुभाष शिरोडकर, आमदार श्री. दिगंबर कामत, आमदार श्री. नीलेश काब्राल, आमदार श्री. दाजी साळकर, आमदार श्री. संकल्प आमोणकर, आमदार श्री. उल्हास तुयेकर, आमदार श्री. गणेश गावकर, आमदार श्री. आलेक्स रेजिनाल्ड ल़ॉरेन्स, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सौ. सुवर्णा तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री श्री. बाबू कवळेकर, दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघातील भाजपाचे अन्य पदाधिकारी, विविध पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्री. माॅविन गुदिन्हो यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले होते, काँग्रेसच्या उमेदवारावर आमचा एक आमदार भारी पडला होता. 2019 च्या निवडणुकीत आमच्या सोबत नसलेले श्री. दिगंबर कामत, श्री. रवी नाईक, श्री. आलेक्स सिक्वेरा, श्री. सुदिन ढवळीकर आदी नेत्यांनी भाजपा व सौ. धेंपो यांना पाठिंबा दिला आहे. आरक्षण लागू झालेले नसतानाही आम्ही एका महिलेला लोकसभेवर पाठवू शकतो हे दाखवून दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सौ. धेंपो म्हणाल्या, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा, गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदार यांची मी आभारी आहे. भाजपाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. प्रचारदौऱ्यावेळी लोकांनी मांडलेले विकास, रोजगार आणि महिला सशक्तीकरणासारखे विषय हाताळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.