गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संपूर्ण दक्षिण गोवा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा, प्राणघातक शस्त्रे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी जवळ बाळगण्यास आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई केली आहे.

तथापि वरील निर्बंध सार्वजनिक सेवक, पोलीस, संरक्षण कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले सुरक्षा कर्मचारी/ क्रीडा व्यक्ती जे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सदस्य आहेत, बँकांचे जबाबदार व्यक्ती आणि त्यांचे राखणदार यांना लागू होणार नाहीत. याचे उल्लंघन केल्यास आयपीएस च्या कलम १८८ नुसार दंडनीय आहे.