गोवा खबर:डिचोली वीज खात्याच्या कार्यालयाने डिचोली, मयें, सांखळी, पर्यें आणि वाळपई मतदारसंघातील वीज ग्राहकांना आणि अस्नोडा, इब्रामपूर भागातील वीज ग्राहकांनी आपली बिलांची थकबाकी असल्यास ती त्वरीत भरावी अन्यथा पूर्व सूचना न देता त्याची कनेक्शने तोडण्यात येतील असे कळविले आहे.

कुर्टी फोंडा वीज खात्याच्या कार्यालयाने फोंडा आणि धारबांदोडा भागातील बांदोडा, मडकई, फोंडा, कवळे, तळावली, दुर्भाट, कुंडई, माशेल, सावईवेरें, उसगाव, वेलिंग प्रियोळ, कुंकळी भोमा, वेंरें, वळवई, बेतकी, साकोर्डा, धारबांदोडा, कुर्टी येथील वीज ग्राहकांनी आपली बिलांची थकबाकी असल्यास ती त्वरीत भरावी अन्यथा पूर्व सूचना न देता त्याची कनेक्शने तोडण्यात येतील असे कळविले आहे.