Connect with us

गोवा खबर

आगशी इथल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा आमदार विरेश बोरकर यांच्याकडून उद्घाटन

Published

on

Spread the love
गोवा खबर:सांत आंद्रेतील रेव्होलुशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांच्या कामाचा आवाका एव्हाना सर्वांनाच समजला आहे. अनेकदा विरोधी पक्षातले नेतेदेखील बोरकर यांच्या कामांचं, त्यांच्या गतीचं कौतुक करतात. सत्तेत नसून सुद्धा ते प्रशासकीय अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून, त्यांच्याकडून कामे करून घेतात.
सांत आंद्रेतील आगशी पंचायत क्षेत्रातील मोईता वाडा, पाद्रिभाट व दुक्रे वाडा इथल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन स्थानिक आमदार विरेश बोरकर यांनी केले. अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचे काम प्रलंबित होते. ह्या वाड्यातील लोकांना रस्ता नसल्यामुळे भरपूर त्रास सहन करावा लागत होता. दाट लोकवस्ती असलेल्या ह्या सर्व वाड्यातील लोकांची रस्ता दुरूस्ती झाला पाहिजे, अशी मागणी होत होती.
अखेर या वर्षी त्या रस्त्याचे काम आमदार विरेश बोरकर यांच्या पाठपुराव्याने पूर्णत्वास येत असून, जवळजवळ पंधरा लाख रुपयांचा निधी ह्या कामासाठी मंजूर होऊन, काम सुरू झालेले आहे. रस्ते दुरूस्ती बरोबरच, नवीन रस्ता निर्मितीची कामं सुरूच राहणार असून, आपल्या सांत आंद्रे मतदारसंघातील विकासासाठी आपण कटिबद्ध आहे आणि ही विकासकामे अशीच चालू राहणार असल्याचे विरेश बोरकर यांनी म्हटले. यावेळी आगशी पंचायत सरपंच पंच सदस्य उपस्थित होते.