गोवा खबर : देशात द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण होत असल्याचा आरोप करताना, गोवा प्रदेश युवक काँग्रेसने शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘बेहतर भारत की बनियाद’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन युवकांना केले.
गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद्र यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, देशातील युवक द्वेष आणि विभाजनाचे राजकारण नष्ट करून बदल घडवू पाहत आहेत.
सरचिटणीस अहराज मुल्ला, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष महेश नादर, सोशल मीडिया प्रभारी देवसुरबी यदुवंशी उपस्थित होते.
“देशात आणि गोव्यातही बेरोजगारीची समस्या आहे. भाजप सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले आहे. मी तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी ‘बेहतर भारत की बुनियाद’ या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि देशातून द्वेषपूर्ण राजकारण पुसून टाकण्यास मदत करावी,” असे आंद्राद्र म्हणाले.
“आपला देश आर्थिक, सामाजिक व राजकीय आव्हानांचा सामना करत आहे. आताच्या तरुणांना बदल हवा आहे,” असे तो म्हणाला.
10 ते 12 जुलै दरम्यान बेंगळुरू येथे ‘बेहतर भारत की बुनियाद’ अधिवेशन होणार असून, त्यात युवक काँग्रेसचे सदस्य सहभागी होणार आहेत असे आंद्राद यांनी सांगितले.
सरचिटणीस अहराज मुल्ला म्हणाले की, देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत पाया आवश्यक आहे आणि यासाठी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
“या अधिवेशनापूर्वी आम्ही गोव्यात स्थानिक चर्चा करू आणि त्यानंतर आम्ही हा प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी अधिवेशनाला उपस्थित राहू,” असे मुल्ला म्हणाले.
बेरोजगारी ही देशातील प्रमुख समस्या असल्याचे ते म्हणाले.
दक्षिणगोवा जिल्हाध्यक्ष महेश नादर म्हणाले की, भारतातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. “आम्ही या विषयांवर अधिवेशनात चर्चा करू,” असे ते म्हणाले.
सोशल मीडिया प्रभारी देवसुरबी यदुवंशी यांनी युवकांना काँग्रेसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्याचे आवाहन केले.