– एसकेएफ इंडियाच्या १३ व्या आवृत्तीत ‘द २०–मायलर‘ रेस
– वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने १० किमी “कार्पोरेट चलेंज” स्पर्धेचे आयोजन
गोवा खबर: बेअरिंग्ज आणि सेवा प्रदान करणारे आघाडीचे तंत्रज्ञान आणि समाधान प्रदाता एसकेएफ इंडिया यांनी गोवा रिव्हर मॅरेथॉन (जीआरएम) साठी सलग तिसऱ्या वर्षी वास्को स्पोर्ट्स क्लबसोबत आपली भागीदारी केली आहे. ही मॅरेथॉन रविवार १० डिसेंबर रोजी चिखली, वास्को दि गामा येथे होणार आहे. याशिवाय यंदा प्रथमच वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने १० किमी “कार्पोरेट चलेंज” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या १३ व्या आवृत्तीत, त्याच्या शर्यतींच्या श्रेणींमध्ये भर पडणार आहे. यंदा प्रथमच “२० मायलर” (३२ किमी) ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामुळे या शर्यतीच्या श्रेणीचा समावेश असलेल्या देशातील काही मॅरेथॉन्सपैकी गोवा रिव्हर मॅरेथॉन असणार आहे.

या मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी), अर्ध मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी, शालेय संघांसाठी ५ किमी शर्यत आणि पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी मागील आवृत्ती प्रमाणे ५ किमी फन ही स्पर्धाही असणार आहेत.
वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि जीआयडीसी (गोवा इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १८ जून रोजी सकाळी ६ वाजता
उद्घाटन रन वेर्णा औद्योगिक वसाहत येथे होईल. या रनमध्ये संपूर्ण गोव्यातील १००० हून अधिक धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे.

कार्यक्रमाचे प्रवर्तक आणि वास्को स्पोर्ट्स क्लबचे (व्हीएससी) अध्यक्ष नितीन बांदेकर म्हणाले, “आमचा शीर्षक प्रायोजक म्हणून एसकेएफसह पुन्हा एकदा सहकार्य करण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. “२० मायलर” शर्यत हाफ मॅरेथॉनर्सना हळूहळू पूर्ण मॅरेथॉनकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अशी संधी देणारे आम्ही देशातील एकमेव मॅरेथॉन असू शकतो.”
एसकेएफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर म्हणाले, “गोवा रिव्हर मॅरेथॉनचे शीर्षक प्रायोजक म्हणून आमच्या भागीदारीचे नूतनीकरण करताना आम्हाला अभिमान वाटतो. दोन्ही संस्था धावण्याचा आनंद आणि मानवी आत्म्याचे सामर्थ्य साजरे करण्याची वचनबद्धता सामायिक करतात .”
वास्को स्पोर्ट्स क्लबचे सचिव राकेश उन्नी म्हणाले, “सहा महिने अगोदर या स्पर्धेची घोषणा करून, आम्ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील विक्रमी धावपटूंचे स्वागत करू इच्छितो.”
व्यासपीठावर वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष प्रदिप डिकोस्टा, सीएएम इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक कायतानो फर्नांडिस, व्हेंचर बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक कमलाप्रसाद यादव आणि वास्को स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार अभिजीत साळकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
मॅरेथॉनसाठी नोंदणी आता सुरू झाली आहे. धावपटू अधिकृत वेबसाइटवर साइन अप करू शकतात. www.skfgoarivermarathon.com
गट सवलती आणि सर्वोत्तम ऑफरचा आनंद घेण्यासाठी सहभागी आता नोंदणी करू शकतात.