गोवा खबर: गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस – २०२४ साजरा करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आधारित संस्थांकडून अनुदान-सहाय्यासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. विज्ञान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि सामान्य जनतेच्या सहभागाने वादविवाद, प्रश्नमंजुषा, प्रदर्शने, व्याख्याने, रेडिओ टॉक शो इ. यांसारख्या वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
त्याचप्रमाणे राज्यांत २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस पाळण्यात येईल. २२ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय गणित दिनानिमित्ताने गणित संबंधित प्रस्नमंजुशा, व्याख्याने आणि स्पर्धेचे आयोजन करम्यासाठी इच्छुक शाळां आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित संघटनांकडून प्रस्ताव नागविले आहेत.

सदस्य सचिव, गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळ, साळगांव, सेमिनारी समोर, साळगांव-बार्देस ४०३५११ येथे प्रस्तांव सुपुर्द करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ अशी आहे.
अधिक माहितीसाठी किंवा सहाय्यासाठी, इच्छुक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विज्ञान व तंत्रज्ञान बिगर सरकारी संघटनानी कार्यक्रमाचे प्रकल्प अन्वेषक श्री संजीव आर चोडणकर यांच्याशी ९२८४७९४२२० किंवा श्री. फ्रान्सिस्को लुकास, ९८५०१४२०३६ यांच्याशी संपर्क साधावा.