नाईक फुलकार समाजातर्फे वेलिंग प्रियोळ कुंकळये पंचायतीला मदतीसाठी निवेदन
गोवा खबर:गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे प्रियोळ म्हार्दोळ गावातील जाईच्या बागायती जळून भस्मसात झाल्या आहेत. या घटनेमुळे म्हार्दोळचे जाई फुलकारावर मोठे संकट कोसळले आहे. कित्येक पिढ्या याच जाईच्या फुलावर धंधा करून हे फुलकार शेतकरी आपला संसार चालवत होते. या जाई बागायतीना लागलेल्या आगीमुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या मोठे नुकसान झालेले आहे.
काल सोमवारी नाईक फुलकार समाजाच्या वतीने वेलिंग प्रियोळ कुंकळये ग्राम पंचायतीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक त्याच बरोबर ती जाई बागायत पूर्वीसारखे करण्यासंबंधी मदतीचे निवेदन देण्यात आले आहे.

दोन अडीच महिने झाले ह्या घटनेला, एकाही आजी माजी आमदाराने त्याचबरोबर खुद वेलिंग प्रियोळ कुंकळये पंचायतीने सुद्धा याची दखल घेतली नाही. रेव्होलुशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या प्रियोळ दौऱ्या दरम्यान स्वतः ह्या जाई बागायतीची पाहणी केली होती. शेतकऱ्याशी चर्चा करून त्यांचे दुःख जाणून घेतले होते. हे प्रकरण समाज माध्यमाद्वारे सरकारच्या नजरेत आणून दिले होते.
जाईची फुले बागायत ही म्हार्दोळ गावचे वैभव आहेत. सुप्रसिद्ध जायांचि पूजा सुद्धा याच गावात महालसा मंदिरामध्ये केली जाते. परंतु आज य गावातील जाई बागायातीला अज्ञाताने आग लावल्यामुळे सर्व च्या सर्व जाईची झाडे जळून खाक झाली आहे. पुढे यावर्षी जायांची पूजेला जाई आणणार कोठून हा मोठा प्रश्न त्या फुलकाराना पडलेला असून, सरकारने या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती रेव्होलुशनरी गोवन्सचे कार्यकर्ते गौरेश गावडे यांनी केली आहे.
जाई फुलांचा हा व्यवसाय पूर्वजापासून चालत आलेला असून, या धंद्यावरच आपला उदरनिर्वाह चालतो, एक जाईचे झाड तयार होण्यास जवळ जवळ चार वर्षे लागतात. आज आमचे जाई बागायतीना लागलेल्या आगीमुळे पोटा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे स्थानिक फुलकारानी म्हटले आहे.
नाईक फुलकार समाजातर्फे करण्यात आलेले हे निवेदन कृषी कार्यालयात, जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर मामलेदार यांना सुद्धा देण्यात येणार आहे. सरकारकडून त्यांना त्यांची जाई बागायत पुन्हा फुलवण्यासाठी आर्थिक मदत द्यावी असे हे निवेदनात म्हटले आहे.