गोवा खबर:सध्या कर्नाटकमध्ये राजकीय क्षेत्रात म्हादयी नदीचा विषय प्रमुख मुद्धा झालेला असून, कर्नाटक आणि गोवा राज्यातील बीजेपी पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हादयी नदी कर्नाटकच्या हवाली करून गोवेकरावर अन्याय करत असल्याची टीका मनोज परब यांनी काल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
कर्नाटकमध्ये सध्या निवडणूक होणार असून, त्याच अनुषंगाने तिथल्या बीजेपी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कळसा भांडुरा प्रकल्प ते करूनच दाखवणारा असे सांगण्यात आलेले असून, गोव्यातील बीजेपी सरकारचे आमदार तसेच मंत्रिसुद्धा त्यांच्या प्रचारात सामील होऊन ते ही या प्रकल्पाला पाठिंबा देत असल्याचे आता सिद्ध झालेले असून, गोव्यातील जनतेने आता सावध राहिले पाहिजे असे मनोज परब म्हणाले.
कर्नाटक सरकारकडून गोव्याची जीवनदायिनी म्हादयी आज गोवेकरापासून हिसकावण्यात येत आहे. कळसा भांडूरा हा प्रकल्प कर्नाटक मध्ये करून इथे गोवेकरावर जीवन मरणाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु गोव्यातील बीजेपी चे सर्व नेते कर्नाटकात बीजेपी ची ह्याच प्रकल्पाचा प्रसार करण्यात मग्न असून, ही अत्यंत दुखत आणि लाजिरवाणी गोष्ट असून, बीजेपीचे केंद्र सरकार, कर्नाटकातील बीजेपी सरकार व गोव्यातील बीजेपी सरकार या तिघांनी मिळून गोवेकराना तहानेने व्याकूळ करण्याचे षडयंत्र आखले असल्याचे परब म्हणाले.
कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचाराचे नेतृत्व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असून, ते म्हादयी नदीचे पाणी कर्नाटकातील जनतेला देण्यात येणार असल्याचे छाती ठोकून सांगत आहे. परंतु दुसरीकडे हेच प्रमोद सावंत गोव्यात असताना आम्ही गोवेकरावर अन्याय होऊ देणार नाही. कळसा भांडूरा प्रकल्पाला आमचा विरोध आहे असे दुतोंडी भाषा करत असून, प्रमोद सावंत यांनी कर्नाटकमध्ये बीजेपी प्रचाराला सामील होऊन म्हादयी नदीला ज्या नदीला ते आई म्हणतात तिलाच विकून त्यांनी गोव्यातील जनतेकडे तसेच गोमंतभुमिकडे गद्धारी केली असल्याचे परब म्हणाले.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेला हा विश्वासघात असून या सारखे दुसरे पाप नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः गोव्यातील जनतेला यामागचे स्पष्टीकरण द्यावे असेही परब म्हणाले.
कर्नाटकात प्रचार करण्यात विश्वजित राणे, दाजी साळकर हे अग्रेसर असून ह्याच राजकारण्याची आपआपल्या मतदारसंघात परप्रांतीयांची वोट बँक असल्या कारणाने कर्नाटकी माणसांच्या समर्थनात ये आज कर्नाटकात प्रचारात गुंतले आहे. सत्तरी हा विश्वजित राणे यांच्याच मतदारसंघ असून तिथे म्हादय नदीच्या पाण्यावर शंभर टक्के लोक जगत आहे. मतदारसंघात पाण्याची टंचाई आहे. लोक पाण्यासाठी वणवण भटकतात. रस्त्यारस्त्यावर पाण्यासाठी भांडी, बरल्स ठेवलेली आहे. लोक अक्षरशः हालाखीच जीवन जगत आहे. परंतु हेच बीजेपी चे आमदार राणे व इतर आपली गोव्याची जीवनदायिनी चोरणाऱ्या कर्नाटकमधील बीजेपी पक्षाच्या प्रचाराला गेलेले आहे ही गोष्ट अत्यंत वाईट गोष्ट असल्याचे परब म्हणाले.
पुढे बोलताना परब म्हणाले की सत्तरितील लोकांना त्यांच्या जमिनी नावावर नाही ते नाहीच, पण आता सत्तरिकराना पाण्यासाठी लाचार करण्याचा घाट या दिव्या राणे आणि विश्वजित राणे यांनी घातला असून, मोठ्या दिमाखात ती दोघं कर्नाटकात बीजेपी चा प्रचार करत असल्याचे परब म्हणाले.
सुभाष फळदेसाई यांच्यावरही परब यांची टीका
या पत्रकार परिषदेत बोलताना परब यांनी सांगेतील आमदार सुभाष फळदेसाई यांच्यावरही टीका केली आहे. सांगेतील जनता ह्या नदीवर अवलंबून आहे. सांगे मतदारसंघात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानासुद्धा तेथील आमदार मात्र कर्नाटकात प्रचार करण्यात दंग असल्याचे परब म्हणाले.
बीजेपी पेक्षाही काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खतरनाक
कर्नाटकात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झालेली असून बीजेपी बरोबरच काँग्रेस पक्षानेही आपला जाहीर नामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातसुध्दा म्हादय नदीवर कळसा भांडूरा प्रकल्पाला पाठिंबा असून काँग्रेसचे जर सरकार आलं तर ते हा प्रकल्प लवकर करू असे म्हटले आहे. परब यांनी गोव्यातील जनतेला विनंती केली की यापुढे बीजेपी व काँग्रेस पक्ष ज्यांनी आपल्या जीवनदायिनी म्हादयचा सौदा केला त्याच्यावर विश्वास ठेवू नये. त्याच्या कोणत्याच आश्वासनाला बळी पडू नये.
या पत्रकारपरिषदेत सांत आंद्रे तील आमदार विरेश बोरकर उपस्थित होते. त्यांनी राज्यातील बीजेपी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून, राज्यात पाण्याचा प्रश्न उद्भवलेला असताना हे बीजेपी काँग्रेसचे राजकीय नेते स्वताच्या स्वार्थासाठी कर्नाटकात प्रचार करण्यात मग्न झालेले असून, यापुढे गोव्यातील जनतेने अशा राजकीय पक्षांवर विश्वास ठेवू नये असे ते म्हणाले.