Connect with us

क्राइम खबर

हॉटेल/घरमालकांनी आपल्या ग्राहकांची, भाडेकरूंची माहिती नोंद करण्याचा आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे उत्तर गोव्यातील सर्व हॉटेलांचे मालक/व्यवस्थापन, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गॅस्ट हाऊस, पेईंग गेस्ट हाऊस, निवासाची व्यवस्था करणारे घरमालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकाकडे मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्राची मागणी करावी. ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा घरांत राहण्यास देवू नये.

तसेच मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती पोलीस खात्याने तयार केलेल्या पथीक-PATHIK या सॉफ्टवेरांमध्ये नोंद केली पाहिजे. भाडेकरूची माहिती  जवळच्या पोलीस स्टेशनवर देण्याची गरज आहे. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूची माहिती सांभाळून ठेवावी आणि गरज असते तेव्हां अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी.