गोवा खबर: भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ११ ऑगस्ट २०२२ पूर्वी घडलेल्या पात्र कार्यक्रमांच्या संदर्भात आणि ज्यांना अशा घटनेसाठी रोख पुरस्कार मिळालेले नाहीत अशा खेळाडूंना रोख पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याची एक वेळची संधी देत आहे. खेळाडूंना क्रीडा खात्याच्या डीबीटी- एमआयएस पोर्टलद्वारे (https://dbtyas-sports.gov.in ) वर थेट अर्ज करावा लागेल.

अर्जदारांना ३० एप्रिल २०२३ पर्यंत योजनेंतर्गत अर्ज करण्याची एकवेळ संधी दिली जाते. अर्ज केवळ क्रीडा खात्याच्या डीबीटी- एमआयएस पोर्टलद्वारे (https://dbtyas-sports.gov.in ) सादर करावा. कोणतेही प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.