Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला जी२० बैठकांच्या तयारीचा आढावा

Published

on

Spread the love

 

 

 

गोवा खबर: १७ एप्रिल रोजी होणाऱ्या जी२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांसाठी गोव्यातील तयारीबाबतचा आढावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला. या बैठकीस विविध कामांसाठी नियुक्त त्या त्या खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

जी-२० साठीचे राज्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज हेसुद्धा या बैठकीस उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रत्येक खात्यांच्या कामांच्या स्थितीबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. यामध्ये वीज सुविधा, विविध ठिकाणची प्रकाशयोजना, जीएसआयडीचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे राबवण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम कामे, अन्नसुरक्षा यंत्रणेद्वारे अन्नतपासणी व्यवस्था, आरोग्य संचालनालयाची आरोग्यसेवा, कंदब परिवहन मंडळाने केलेले वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, माहिती तंत्रज्ञान व संपर्क विभागाद्वारे केलेली इंटरनेट जोडणी व्यवस्था, कला व संस्कृती खात्याद्वारे नियोजित करण्यात आलेले सांस्कृतिक उपक्रम, जीडब्लूएमसीचे कचरा व्यवस्थापन आणि शिष्टाचार विभागाद्वारे नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांची कामे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

त्याचबरोबर इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. यामध्ये निमंत्रितांना भेट द्यावयाची पिशवी, स्मृतिचिन्हे, कार्यालयीन जागा, संवाद धोरण, निमंत्रितांसाठी सहलींचे नियोजन, रस्ता सौंदर्यीकरण, शहराचे सुशोभिकरण आणि स्मार्ट सिटी अभियानातील कामे यांचा समावेश होता.

 

या बैठकीमध्ये विविध कामांसाठी जबाबदारी सोपवण्यात आलेले अधिकारी आणि त्या त्या विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सुरक्षा समन्वयासाठीचे नोडल अधिकारी गोव्याचे पोलिस महानिरिक्षक ओमवीर सिंग (आयपीएस); शिष्टाचार विभागाचे अवर सचिव व जी-२० साठीचे शिष्टाचार विषयक विशेष अधिकारी श्रेयस डी सिल्वा; कला व संस्कृती उपसंचालक व ओएसडी (सांस्कृतिक उपक्रम) अशोक परब; सांबाखाचे कार्यकारी अभियंता-२ आणि नागरी सुधारणा कामांसाठीचे ओएसडी एदुआर्द परेरा; वीज खात्याचे कार्यकारी अभियंता, विभाग-१ आणि जी२०

 

 

 

 

साठीचे ओएसडी (वीज कामे) अरुण पाटील; महापालिका अभियंता, ओएसडी (शहर सुशोभिकरण) विवेक पार्सेकर; परिवहन विभागाचे सरव्यवस्थापक आणि ओएसडी (परिवहन) लक्ष्मीकांत वांयगणकर; सरव्यवस्थापक (हॉटेल्स) आणि ओएसडी (आदरातिथ्य) गेविन डायस; पणन खात्याचे उप सरव्यवस्थापक आणि ओएसडी (ब्रँडिंग) दीपक नार्वेकर; प्रवास विभागाचे व्यवस्थापक आणि ओएसडी (टुर्स) अनिल दलाल, आणि आयुषमान भारत, डिजिटल इंडिया, आरोग्यसेवा संचालनालयाचे नोडल अधिकारी व ओएसडी (आरोग्यसेवा) डॉ. केदार रायकर यांचा समावेश होता.

गोवा सरकारद्वारे जी२० बैठकांसाठीची तयारी व त्यासाठी आवश्यक साधनसुविधांच्या विकासाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून यामध्ये कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाही. विविध कामांची जबाबदारी देण्यात आलेले अधिकारी विविध खाती, विभाग, यंत्रणांसमवेत समन्वय साधत प्रत्येक निर्धारित काम पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न राबवत असून जी२०च्या बैठकांचे चोख आयोजन होण्याबाबत आवश्यक उपाययोजना राबवत आहेत.