गोवा खबर: आरएसएस आणि भाजपवर कडाडून टिका करताना, गोव्याचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सांगितले की, आरएसएस आणि भाजपने नेहमीच बहुजन समाजाच्या विरोधात काम केले आणि त्यांचा वापर व्होट बँकसाठी केला.
जेव्हा आरएसएस आणि भाजप निराश होतात आणि त्यांच्याकडे उत्तरे नसतात तेव्हा ‘जात कार्ड’ वापरणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे, असे त्यांनी नमूद केले.
चोडणकर यांनी बुधवारी म्हापसा येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या मुद्द्यावरून आरएसएस आणि भाजप लोकांची आणि विशेषतः ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले.
माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, वीरेंद्र शिरोडकर, शशांक नार्वेकर, संजय बर्डे, विशाल वळवईकर, संदीप पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.
“राहुल गांधी यांनी नेहमीच ओबीसी, एससी आणि एसटीला प्रोत्साहन दिले आहे. काँग्रेसने 1992 मध्ये ओबीसी आरक्षण दिले आणि त्यानंतर 27 टक्के आरक्षण दिले. 2006 मध्ये काँग्रेसने ओबीसींना उच्च शिक्षणासाठी 27 टक्के आरक्षण दिले होते,” असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, 32.58 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, त्यापैकी केवळ 7 लाख ओबीसी आणि त्यात 6.40 लाख ’सी’ वर्गात कार्यरत आहेत.
“केंद्र सरकारमध्ये 89 सचिव आहेत, परंतु त्यापैकी एकही ओबीसी नाही,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने ओबीसी, एसटी आणि एससीसाठी आरक्षण दिले, परंतु गोव्यात बहुजन समाजाच्या उमेदवारांना यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला असे चोडणकर यांनी सांगितले.
भाजप आणि आरएसएस बहुजन समाजाची राजकीय कारकीर्द कशी संपवण्याचा प्रयत्न करत आहेत याचे उदाहरण देत चोडणकर यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना त्यांच्याच मंत्रालयाकडून अर्थसहाय्य केलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे निदर्शनास आणून दिले. “त्यानंतर त्यांना मीडियासमोर हा मुद्दा मांडण्यास भाग पाडण्यात आले,” असे ते म्हणाले,
भाजप ओबीसींच्या हितासाठी काम करण्यात अपयशी ठरले आहे असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसच्या आठ आमदारांचे भाजपमध्ये स्वागत करण्याचा प्रयत्न म्हणजे बहुजन नेतृत्व संपवण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले.
“राहुल गांधी यांनी कधीही ओबीसी नेते ‘चोर’ असल्याचे म्हटलेले नाही. नीरव मोदी आणि ललित मोदी ओबीसीचे आहेत का? ते ओबीसी असले तरी तो ओबीसीचा अपमान नाही कारण राहुल गांधींनी ओबीसींच्या विरोधात काहीही म्हटलेले नाही, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भाजप जेव्हा निराश होते आणि त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा ते ‘जात आणि धर्माचे कार्ड’ वापरतात.
“भाजप नेते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने नेहमीच ओबीसींचा व्होट बँक म्हणून वापर केला आहे. त्यांनी कायमच ओबीसी, एससी आणि एसटीचा द्वेष केला आहे. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी गेल्या नऊ वर्षात ओबीसींसाठी काय लाभार्थाचे काम केले आहे ते दाखवावे,” असे ते म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते, परंतु ते त्यांना उत्तर देऊ शकले नाहीत.
“राष्ट्राची संपत्ती ही लोकांची आहे. ही मोदी किंवा भाजपची खाजगी मालमत्ता नाही. राष्ट्राच्या मालमत्तेबद्दल प्रश्न करणे हा जनतेचा अधिकार आहे. राहुल गांधींना हे विचारण्याचा अधिकार आहे कारण ते संसदेचे सदस्य होते.
ते म्हणाले की, काँग्रेसने कधीही संसदेत प्रश्न विचारल्याबद्दल कोणत्याही सदस्याला अपात्र केले नाही. “विरोधक काँग्रेसवर आणि मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींवरही आरोप करायचे. मात्र लोकशाही टिकवायची असल्याने आम्ही सूडाचे राजकारण कधीच केले नाही, असे चोडणकर म्हणाले.
“राहुल गांधी यांनी अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये असलेले रु 20,000 कोटी कोणाचे आहेत? असा सवाल केला होता. तसेच
अदानी आनी मोदींच्या संबंधा संबंधी विचारले होते. मात्र
या प्रश्नांवर सत्ताधारी गप्प बसले, असे ते म्हणाले.
मानहानीच्या खटल्याबद्दल बोलताना, चोडणकर म्हणाले की याची शिक्षा 2 वर्षांपेक्षा कमी असू शकते. परंतु शिक्षेचे प्रमाण केवळ 2 वर्षांचे होते कारण त्यामुळे भाजप सरकारला त्यांना अपात्र ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला.
या घटनांवरून भाजप आणि आरएसएस राहुल गांधींना घाबरत असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी स्वतः ते सिद्ध केले. राहुल गांधी हे शक्तिशाली नेते आहेत आणि न घाबरता लोकांचे प्रश्न मांडतात, असे चोडणकर म्हणाले.
राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर भाजपने राहुल गांधींची माफी मागावी, असे ते म्हणाले.
काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले की, आरएसएस भाजपला राहुल गांधींविरोधात बोलण्याची सूचना देत आहेत.
राज्यात दंत महाविद्यालय आणि जीएमसीमध्ये आरक्षण देण्यात भाजपला अपयश आले. ओबीसींवर अन्याय झाला आहे. भाजप या मुद्द्यांवर का बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला.