Connect with us

क्रीडा खबर

गोवा प्रोफेशनल लीगसाठी एफसी गोवाचा 25 खेळाडूंचा संघ जाहीर

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: एफसी गोवाच्या गोवा प्रोफेशनल लीग (जीपीएल) 2022-23साठी एफसी गोवाचा 25 खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात हृतिक तिवारी, लेस्ली रिबेलो, लालरेमृआता एचपी, फ्रांग्की बुआम आणि मुहम्मद नेमिल या गौर्सच्या फर्स्ट टीममधील पाच प्लेअर्सचा समावेश आहे. जीपीएल फुटबॉल स्पर्धा 9 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे.

 

एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक म्हणून एफसी गोवा डेव्ह टीमचे मुख्य प्रशिक्षक डेगी कोर्डोझो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुगीतेश मांद्रेकर हे सहप्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

 

गोवा प्रोफेशनल लीगसाठी आमचा संघ सज्ज आहे. खेळाडू हे वैयक्तिक आणि सांघिक सरावाच्या माध्यमातून मेहनत घेत आहेत. फर्स्ट टीममध्ये संधी मिळवण्यादृष्टीने संधी म्हणून जीपीएलकडे पाहिले जात आहे. त्यामुळे खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल, असे जीपीएलच्या पार्श्वभूमीवर कोर्डोझो यांनी सांगितले.

 

ड्युरँड चषकासाठी डेव्ह टीम पाठवल्याबद्दल मी एफसी गोवा व्यवस्थापनाचा आभारी आहे. अव्वल स्तरावरील या स्पर्धेत खेळल्याने आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. ड्युरँड चषक स्पर्धेतून परतल्यानंतर आम्ही अनेक लोकल टीम तसेच फर्स्ट टीमसोबत काही सामने खेळलो आहोत. त्याचा फायदा आम्ही जीपीएलमध्ये खेळताना होईल. त्यामुळे या लीगमध्ये आमचा खेळ उंचावेल, असा विश्वास कोर्डोझो यांनी व्यक्त केला.

 

बॉइज इन ऑरेंज यांची जीपीएलमधील सलामीची लढत 9 डिसेंबरला स्पोर्टिंग डी गोवा संघाविरुद्ध दुलेर स्टेडियम येथे होईल. या सामन्याला सायं. 3.45 वा. सुरुवात होईल.

 

एफसी गोवा संघ पुढीलप्रमाणे

गोलकीपर्स: हॅन्सेल अलिस्टर कोइल्हो, हृतिक तिवारी, बॉब जॅक्सन राज, मिकी डायस

 

डिफेंडर्स: रायन रॉजर मेनेझेस (कर्णधार), लेस्ली रिबेलो, लीवान कॅस्टॅना, आदित्य हेमंत साळगावकर, कुणाल केशव कुंडलकर, मनुशॉन जोएल फर्नांडेस, मलिकजॅन, मुनाफ कालेगर, दिशांक कुन्हलीकर, सलमान फॅरिस

 

मिडफिल्डर्स: लालरेमृता एचपी, माल्सावंलुआंगा, रायन मेनेझेस

 

फॉरवर्ड्स: वासिम इनामदार, व्हेलरॉय फर्नांडेस, फ्रांग्की बुआम, मुहम्मद नेमिल, मेवान डायस, जोवियल डायस, डेल्टन कॉलॅको, सॅल्गेओ डायस, जॉर्डन बोर्गेस

गोवा प्रोफेशनल लीग 2022-23चे वेळापत्रक

 

Date Opponents Time (IST) Venue
December 9, 2022 Sporting Clube de Goa 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
December 15, 2022 Sesa FA 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
December 19, 2022 Calangute Association 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
December 28, 2022 Guardian Angel SC 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
January 3, 2023 Vasco SC 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
January 9, 2023 Velsao S&CC 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
January 13, 2023 Panjim Footballers 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
January 17, 2023 Salgaocar FC 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
January 25, 2022 Churchill Brothers SC 15:45 Duler Football Stadium, Mapusa, Goa
TBD Dempo SC 15:45 TBD