गोवा खबर:राजा राममोहन रॉय यांच्या २५० व्या जयंती निमत्ताने ६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता गोवा राज्य केंद्रीय वाचनालय, कला आणि संस्कृती संचालनालय आणि राजा राममोहन रॉय संस्था, कोलकाता यांच्या संयुक्त विध्यमाने महिला सशक्तिकरण जागृती रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये उत्तर गोव्यांतील पाच शाळांतील सुमारे २५० विद्यार्थीं आणि केंद्रीय वाचनालयाच्या महिला कर्मचारी भाग घेणार आहेत.
कार्यक्रमास कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रॅलीसाठी इतर मान्यवरांत, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, क्युरेटर श्रीमती सुलक्षा कोळमूळे आणि लेखा खात्याचे उपसंचालक सर्वोत्तम सातार्डेकर यांची उपस्थिती असेल. ही रॅली ईडीसी पाटो येथून रिट्झ क्लासिक – बँक ऑफ इंडिया – हॉटेल जिंजर – पाटो सर्कल – एसबीआय बँक समोरून सुरू होईल आणि सेंट्रल लायब्ररी येथे समारोप होईल. केंद्रीय वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांकडून महिला सशक्तीकरणावर पथनाट्य होणार आहे.