गोवा खबर:कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्याहस्ते उद्या 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर म्हार्दोळ येथे श्रीमहालसा मंदिराजवळ ज्ञानटॅक इन्स्टिट्यूटच्या संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
संगणक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी मंत्री आणि केपे अर्बन सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश एस. वेळीप, व्ही. पी. के. संस्थेचे अध्यक्ष श्री. दुर्गादास गावडे, गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. विश्वास गावडे, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. समर्थ बोरकर, वेलिंग-प्रियोळ पंचायतीच्या सरपंच श्रीमती हर्षा गावडे, उपसरपंच रूपेश नाईक, पंच सदस्य श्रीमती वैभवी म्हार्दोळकर उपस्थित असतील.