Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय नागरी अभियांत्रिकी परिषदेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

           

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आशियाई सिव्हील अभियांत्रिकी समन्वय परिषदेद्वारे आयोजित आणि सिव्हील अभियंता संस्था (इंडिया) अंतर्गत “पायाभूत सुविधांसाठी शाश्वत डिझाइन आणि इको टेक्नॉलॉजी” या विषयावर ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर दोना पावला येथे आयोजित ३ दिवसीय ९ व्या आशियाई प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सिव्हील अभियांत्रिकी परिषदेचे उद्घाटन केले.

डॉ. सावंत यांनी निर्मात्यांच्या योगदानाने भारताने ते स्थान मिळविले असल्याने संपूर्ण जग भारताकडे कुतूहलाने पाहत असल्याचे प्रतिपादन केले. भारताला प्रथमच आशियाई प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सिव्हील अभियांत्रिकी परिषदेचे आयोजन करण्याचा मान दिला आहे असे ते म्हणाले.   विविध आशियाई देशांमध्ये विशिष्ट आणि संपूर्ण जगात सिव्हिल अभियांत्रिकी संबंधित समस्यांमधील कौशल्य सामायिक करण्याच्या सिव्हील अभियंत्यांच्या पुढाकाराने मानवतेला फायदा होतो. जगभरातील संस्थांसोबत पायाभूत सुविधांच्या शाश्वत विकासासाठी सहयोगी कार्याला चालना देण्यासाठी विविध तांत्रिक वचनबद्धतेद्वारे सिव्हिल इंजिनीअरिंगच्या प्रगतीसाठी आशियाई सिव्हील अभियांत्रिकी समन्वय परिषदेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

पुढे बोलताना डॉ.सावंत यांनी बंदर, रेल्वे, रस्ते, विमानतळ आणि विपुल जलस्रोत, उत्कृष्ट जीवनशैली आणि पायाभूत सुविधां यांच्या योगदानामुळे गोव्यात मोठी क्षमता आहे असे सांगितले. भविष्यात पायाभूत सुविधांना शाश्वत आधारावर आकार देण्याची संधी गोव्याकडे आहे. पंतप्रधानांच्या जागतिक दृष्टीकोन स्थानिक पातळीवर साकार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण या क्षमतेचा फायदा उचलण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांच्या विजनचे उद्दिष्ट संपूर्ण संबंधित भागधारकांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचे आहे जेणेकरून ते भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकेल असे ते म्हणाले.

गोव्यात पोर्तुगीज राजवटीत बांधलेली सर्वात जुनी वास्तू आहे. गोवा हे किनारपट्टीचे राज्य असल्याने त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचविण्याचे आवाहन त्यांनी प्रतिनिधींना केले. हवामान बदलामुळे समुद्र पातळीत झालेली वाढ आणि ऑफशोअर बांधकामांसाठी आगाऊ उपायाची आवश्यकता या काही समस्या आहेत. गोवा निल अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून सागरी प्रदूषणावर नियंत्रण आणले तरच पर्यटन टिकेल. आम्हाला पर्यावरण वाचवायचे आहे आणि भावी पिढीसाठी आमच्या लवचिक आणि टिकाऊ पायाभूत सुविधांना प्रेरणा द्यायची आहे  असे ते म्हणाले.

पीव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, अभियंता-इन-चीफ, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी सामायिक केलेले ज्ञान म्हणजे ज्ञानाचा गुणाकार. या परिषदेमुळे देशातील पायाभूत सुविधांच्या परिस्थितीला फायदा होईल. जागतिक महामारीचा फटका बसल्यानंतर आता जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय समन्वयाची वेळ आली आहे. असे सांगितले. अभियंत्यांची कौशल्ये, दूरदृष्टी आणि नवकल्पना यातून देशाचे भविष्य घडविण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

आयसीईचे (आय) अध्यक्ष डॉ एसएल स्वामी, एसीईसीसीचे सचिव डीआर आरएम वासन, उदय पी सिंग, श्री सागरसिंह ठाकूर, श्रीमती माया ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. या परिषदेत १६  आशियाई देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांचे रेकॉर्ड केलेले भाषणही यावेळी प्रसारित करण्यात आले. डी आर आर वासन यांनी स्वागत केले. प्रा.टी.आर.पिपलानी यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती माया ठाकूर यांनी आभार मानले.