गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गोवा राज्यातील पंचायतींच्या निवडणूकीमुळे ९, १० आणि १२ ऑगस्ट रोजी मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.