Connect with us

गोवा खबर

इडूआर्डो कॅरेरा एफसी गोवाचे नवे गोलकीपर प्रशिक्षक

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:  एफसी गोवा क्लबचे नवे गोलकीपर प्रशिक्षक म्हणून इडूआर्डो कॅरेरा यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती २०११-१३ हंगामासाठी आहे.

 

कॅरेरा यांनी या नियुक्तीनंतर आनंद व्यक्त केला आहे. एफसी गोवा एक प्रतिथयश क्लब आहे. सांघिक कामगिरी उंचावण्यादृष्टीने आणि सातत्य राखण्यासाठी क्लबकडून घेतले जाणारे प्रयत्न मी ऐकून आहे. माझा अनुभव पणाला लावताना सांघिक कामगिरी उंचावण्यात जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन. भारतातील फुटबॉलचा स्तर दिवसागणिक उंचावत आहे. आशियातील फुटबॉलमध्ये लक्षणीय प्रगती आहे. भारताच्या फुटबॉलमधील उंचावलेल्या आलेखाचा भाग व्हायला आवडेल, असे कॅरेरा यांनी एफसी गोवासोबतच्या करारानंतर सांगितले.

 

कॅरेरा यांची गोलकीपर प्रशिक्षकपदी निवड करण्यात एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांचाही मोठा वाटा आहे. इडू यांना गोलकीपर कोचिंगचा खूप अनुभव आहे. त्यांनी अनेक देश तसेच विविध क्लबसोबत काम केले आहे. त्याचा फायदा एफसी गोवा क्लबच्या गोलकीपिंगमधील सुधारणेसाठी होईल. आमचे सिनियर तसेच युवा गोलकीपर इडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा खेळ उंचावतील, असा विश्वास पेना यांनी बोलून दाखवला.

 

एफसी बार्सिलोना येथून पदवीधर असलेल्या कॅरेरा यांना गोलकीपिंगचे बारकावे ठाऊक आहेत. प्रत्यक्ष खेळादरम्यान गोलकीपरने कधी आक्रमक धोरण स्वीकारावे. तसेच कधी सावध पवित्रा घ्यावा, हे त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे. त्याचाही फायदा क्लबला होईल, असे पेना पुढे म्हणाले.

स्पेन आणि चीनमध्ये कोच

 

एफसी गोवामध्ये गोलकीपर कोच म्हणून जॉईन होणारे इडूआर्डो हे यूइफा ए लायसन्स होल्डर आहेत. त्यांनी स्पेन आणि चीनचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

 

बार्सिलोना येथे जन्मलेल्या ३९ वर्षीय कॅरेरा यांनी त्यांचे फुटबॉल करियर एफसी बार्सिलोना येथून सुरू केले. १९९३ ते २००१ या कालावधीमध्ये त्यांनी क्लबच्या अकॅडमी आणि रिझर्व्ह संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर निवृत्तीपर्यंत स्पेनच्या लोअर टीममध्ये खेळाडू म्हणून कार्यरत होते.

 

कॅरेरा हे ११९७ ते २००० या काळात स्पेनचा राष्ट्रीय संघ तसेच कॅटालोनिया निवडसमिती संघाचा  भाग होते. २०००मध्ये झालेल्या युइफा १६ वर्षांखालील स्पेन संघातूनही खेळले होते.

 

खेळाडू असतानाच इडूआर्डो हे बार्सिलोना अकॅडमीशी जोडले गेले. अमेरिका आणि डॉमिनिकन रिपब्लिक येथे कॅटालन क्लबचे गोलकिपिंग कोच म्हणून जॉईन होण्यापूर्वी चीनमध्ये चायनीज फुटबॉल असोसिएशांच्या युवा टॅलेंट अकादमीला मार्गदर्शन केले.

 

२०२०मध्ये कॅरेरा यांनी यूइफा ए कोचिंग लायसन्स मिळवले. त्यानंतर याच वर्षी यूएफा बी गोलकिपिंग लायसन्सही प्राप्त केले.