ब्लेड इंडियाचा विस्तार गोव्यात; राज्यातील हेली-टुरिझमला मिळाली बळकटी
• महाराष्ट्रासह गोव्यातून खासगी चार्टर सेवा सुरू होणार
• गोव्याचे आकाशदर्शनचा आनंद लुटण्यासाठी करता येणार १०-मिनिटांची अनुभवात्मक सफर
गोवा खबर: नागरी हवाई प्रवास सेवादाता कंपनी असलेल्या ब्लेड इंडियाने गोवा राज्य शासनाच्या सहकार्याने आज गोव्यात तीन हेलिकॉप्टर प्रवासी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. गोवा विमानतळ ते उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि जुने गोवा विमानतळ अशा तीन मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यटकांना राज्याच्या विहंगम किनारी पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्रासह गोव्यातूनही खासगी चार्टर सेवा आणि अनुभवात्मक हवाईसफऱ सेवाही सुरू करण्यात येत आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनाही राज्याच्या कोणत्याही भागात सहजपणे प्रवास करता यावा या उद्देशाने कार्यरत असलेले गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सेवेच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
महाराष्ट्रासह कर्नाटकात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यानंतर आपली हवाई प्रवास सेवा देशात वेगाने विस्तारत असून भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात प्रवेशासाठी ब्लेड इंडिया उत्सुक आहे. या सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना आता गोव्यात विविध ठिकाणी जाणे शक्य होणार असून आपल्या गतीने गोव्यातील अनेक स्थळांना भेट देता येणार आहे.
गोवा विमानतळ ते उत्तर व दक्षिण गोव्यात ब्लेड इंडियाची ही हवाईसफऱ सेवा चालणार असून वेबसाइट किंवा एपच्या माध्यमातून प्रवाशांना अवघ्या काही क्षणांत हेलिकॉप्टरमध्ये आपले आसन आरक्षित करता येणार आहे. तसेच गोव्याचे आकाशदर्शन घेण्यासाठी अवघ्या १०-१५ मिनिटांसाठीची अनुभवात्मक सफर करण्याचीही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. तसेच मुंबई, पुणे किंवा गोव्याशेजारील शहरांत जाण्यासाठी संपूर्ण चार्टर हेलिकॉप्टर सेवेचाही लाभ घेता येईल. तसेच सुर्ला व उत्तर गोव्यातील साखळी या ठिकाणीही ही हेलिकॉप्टर सेवेतून प्रवास करता येणार आहे.
नव्या मार्गांवर सेवा सुरू करण्याबाबरत ब्लेड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित दत्ता म्हणाले, “कमीत कमी प्रवासातून गोव्यातील अधिकाधिक ठिकाणांपर्यंत प्रवाशांना पोचता यावे हा या हेलि-टुरिझम सेवेचा उद्देश आहे. रस्त्याद्वारे प्रवासासाठी लागणारा अधिकचा वेळ यामुळे गोवा विमानतळ ते उत्तर-दक्षिण गोवा हे एकमेकापासून दूरच राहिले असून स्थानिकांसह गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठीही हा प्रवास अनुभव चांगला नाही. त्यामुळे या दोन स्थळांना जोडण्याचा आणि स्थानिक व व्यवसायांच्या भरभराटीसाठी त्यांच्यात कायम संपर्क राखणे हा यामागचा उद्देश आहे.”
या सेवेच्या घोषणेप्रसंगी गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “आजवर कधीही न अनुभवलेल्या गोव्याच्या अंतर्गत भागातही पर्यटन करणे या सेवेमुळे शक्य होणार आहे. गोव्यात पर्यटनाला चालना, बळकटी देणाऱ्या अशा व्यावसायिक उपक्रमांना गोवा सरकार प्रोत्साहन देईल. राज्यात यशस्वीपणे या नव्या सेवेचे अनावरण केल्याप्रसंगी ब्लेड इंडियाच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन!”
ब्लेड बाबतची माहिती, दिवसभरातील उड्डाणे, ब्लेडच्या सेवा यांची माहिती
www.flyblade.in या ब्लेड इंडियाच्या वेबसाइटवर तसेच आयओएस व एन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मवर असलेल्या या मोबाईल अप्लिकेशनवर उपलब्ध आहे. तसेच ब्लेड फ्लायर रिलेशन्स टीमशी १८००-१०२-५२३३ या क्रमांकावर संपर्क साधता येतो.