Connect with us

गोवा खबर

राज्यपालांच्याहस्ते काणकोण येथे बेघर महिलांना आर्थिक मदतीचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल  पीएस श्रीधरन पिल्लई यांनी आज काणकोण तालुक्यातील अनुसूचित जमातीतील दोन बेघर महिलांना दोना पावल येथील राजभवन येथे राज्यपाल निधीतून आर्थिक मदतीचे वाटप केले.

 पिल्लई यांनी एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात गोवा संपूर्ण यात्रेचा एक भाग म्हणून काणकोण तालुक्याला भेट दिली होती. त्यांच्या भेटीदरम्यान गोवा विधानसभेच्या सभापतीनी राज्यपालांना श्रीमती कविना के. गावकर आणि श्रीमती पोमू एस. मिराशी यांना आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती.

त्यामुळे राज्यपालांनी प्रत्येकी १ लाख रूपयांची आर्थिक मदत सढळहस्ते वितरीत केली. राज्यपालांनी गोवा विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर, राज्यपालांचे सचिव श्री. आर. मिहीर वर्धन आणि काणकोणचे गट विकास अधिकारी श्री. अनिल नाईक यांच्या उपस्थितीत राजभवनात लाभार्थ्यांना धनादेश वितरीत केले.