गोवा खबर: राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “ईद-उल-फित्र हा पैगंबर मोहम्मद यांनी सांगितलेल्या चिरंतन आणि अमूल्य आदर्शांनुसार जगण्यासाठी स्वता पुर्नसमर्पित होण्याचा एक योग्य प्रसंग आहे. केवळ अशा प्रकारे मानवजातीला शांतता, सौहार्द आणि एकतेचा मार्ग सापडू शकतो. धार्मिक मत्सर, कट्टरता, जातीय द्वेष, पंथीय संघर्ष आणि लोकांमधील अविश्वास यांनी ग्रासलेल्या आजच्या जगात, आपण आपल्या आध्यात्मिक गुरूनी दाखविलेल्या मार्गाचे आणि आदर्शांचे प्रामाणिकपणे अनुसरण करणे आवश्यक आहे. यामुळे आपले जीवन आनंदी आणि निरोगी होईल. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रेषित मोहम्मदांनी आपल्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी दिलेल्या चिरंतन संदेशांचा अक्षरश: सराव करू या.

या वर्षीचा ईद-उल-फित्रचा उत्सव सर्वांना नवीन आनंद, प्रेम आणि शांती घेऊन येवो”, ते पुढे म्हणतात.