Connect with us

गोवा खबर

हिंदु जनजागृती समितीचा रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पणजी येथे स्नेह मेळावा

Published

on

Spread the love



‘हिंदु राष्ट्राचा संकल्प घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित कार्य करणे आवश्यक !: संतोष रिवणकर, ज्येष्ठ अधिवक्ता

गोवा खबर: गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’ हे ध्येय समोर ठेवून एकविचाराने कार्य केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अधिवक्ता संतोष रिवणकर यांनी केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीने नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने पणजी येथील हॉटेल डेल्मन एका स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ अधिवक्ता संतोष रिवणकर यांनी हे आवाहन केले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.


शंखनाद आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बनवलेल्या बोधचिन्हांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेपासूनच्या कार्यात जोडलेल्यांचा हिंदुत्वनिष्ठांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अधिवक्ता संतोष रिवणकर पुढे म्हणाले,‘‘गोव्यात मतपेढीच्या राजकारणामुळे बोली भाषा असलेल्या कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला, तर मराठीला सहभाषेचा दर्जा देण्यात आला. मराठीला हा दर्जा न मिळाल्याने आज गावागावातील मराठी प्राथमिक शाळा बंद पडून आपली संस्कृतीही नष्ट होत आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायला पाहिजे.’’


याप्रसंगी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले,‘‘हिंदूंना संघटित करण्याचे ध्येय ठेवून कार्यरत असलेली हिंदु जनजागृती समिती ही ‘मणींना गुंफणार्‍या माळेतील दोर्‍या’प्रमाणे आहे. गोव्यात पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराविषयी सर्वत्र चर्चा आहे; मात्र त्यापूर्वी सत्तेत असलेल्या बहामनी आणि आदिलशाही राजवटीत मुसलमानांनी केलेल्या अत्याचाराकडे कोणचेही विशेष लक्ष नाही. आदीलशाहांनी गोव्यात हिंदूंवर अत्याचार केलेले आहेत. गोव्यात आदिशाहाची असलेली वास्तू याचा पुरावा आहे. हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सुमारे १५ लक्ष लोकसंख्या असलेल्या गोव्याची संरचना (डेमोग्राफी) पालटण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. गोव्यातील सरकारी रुग्णालयातील जन्मदराच्या संदर्भात माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे या षडयंत्राची पुष्टी होते.

गोव्यात मतदारसंघ इतर राज्यांच्या तुलनेत छोटे असल्याने येथे काही सहस्त्र मतदार निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. वाढत्या मुस्लिम जनसंख्येमुळे आणि अवैध घुसखोरांमुळे गोवा हे देशातील पहिले इस्लामिक राज्य बनवण्यापासून रोखले पाहिजे. त्यासाठी गोव्यातील अनधिकृत भंगारअड्ड्यांवर कारवाई झाली पाहिजे. गोव्यात नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणार्‍या मांस विक्रीच्या दुकानांवर ही कारवाई झाली पाहिजे. गोव्यात मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्यासाठी येथे आलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना हाकलून लावण्यासाठी सर्वांनी कृतीशील बनणे काळाची गरज आहे.’’ महोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या रौप्य महोत्सवी कार्याचा आढावा समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांनी मांडला. संपूर्ण वंदेमातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. राहुल वझे यांनी केले.