Connect with us

गोवा खबर

गोवा युवा पर्यटन संमेलन २०२६ला सुरुवात

Published

on

Spread the love

गोवा खबर: पारंपरिक दीपप्रज्वलनाने‘गोवा युवा पर्यटन संमेलन २०२६’ला सुरुवात झाली. गोव्यातील पर्यटनाचे भविष्य, युवा वर्गाचा सहभाग, तंत्रज्ञान आणि नवकल्पना या विषयांवर या संमेलनात चर्चा करण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व दळणवळण तसेच मुद्रण व लेखनसामग्री मंत्री रोहन खंवटे, पर्यटन संचालक केदार नाईक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व दळणवळण विभागाचे संचालक कबीर के. शिरगावकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रेवती मुजुमदार आणि टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा उपस्थित होते.

गोव्यातील तरुण, आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.