Connect with us

गोवा खबर

‘आयरीस होम फ्रॅग्रन्सेस’ने आपल्या कक्षा ‘अरोमा टॉवर्स’ची ३ वरून २० इन-हाऊस फ्रॅग्रन्स ब्लेंड्सपर्यंत विस्तारली

Published

on

Spread the love

२०२७ पर्यंत १४,००० किरकोळ विक्री केंद्रांचे लक्ष्य

गोवा खबर : भारतातील होम फ्रॅग्रन्स श्रेणीतील अग्रणी आणि बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड असलेल्या ‘आयरीस होम फ्रॅग्रन्सेस’ने आपल्या प्रमुख ‘अरोमा टॉवर्स’ उत्पादन श्रेणीचा विस्तार तीन सिग्नेचर फ्रॅग्रन्सेस २० विशेष इन-हाऊस फ्रॅग्रन्स ब्लेंड्सपर्यंत केला आहे. प्रीमियम घरगुती आणि वातावरणनिर्मिती करणाऱ्या सुगंधी उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने हा विस्तार केला आहे.

पणजी येथे झालेल्या माध्यमांशी संवादाच्या कार्यक्रमात कंपनीने विस्तारित उत्पादन श्रेणीसह हंगामी आणि सणासुदीच्या गिफ्टिंग उत्पादनांचेही अनावरण केले. एक रंगा राव अँड सन्सच्या ७७ वर्षांच्या सुगंध क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर आयरीस किरकोळ विक्री, हॉस्पिटॅलिटी, गिफ्टिंग आणि डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील आपली कार्यकक्षा विस्तारत करत आहे.

मूळ तीन सुगंधांच्या ‘अरोमा टॉवर्स’ला ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांच्या विविध आवडी, प्रसंग आणि घरातील वेगवेगळ्या जागांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही विस्तारित श्रेणी तयार करण्यात आली असून, ब्रँडचे प्रीमियम स्थान कायम ठेवण्यात आले आहे. ‘अरोमा टॉवर्स’सोबतच ‘आयरीस’ने आपल्या भेटवस्तू उत्पादन श्रेणीचाही विस्तार केला आहे. यात रीड डिफ्यूझर्स, सुगंधी मेणबत्त्या, पोटपोरी, सुगंधी कुप्या, व्हेपोरायझर्स, सुगंधी तेले, घरातील  फ्रेशनर्स, अरोमा गिफ्ट सेट्स आणि विशेष सणासुदीच्या हॅम्पर्सचा समावेश आहे. त्याद्वारे ग्राहक, कॉर्पोरेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील गिफ्टिंगच्या संधींवर कंपनीचा भर आहे.

‘आयरीस होम फ्रॅग्रन्सेस’चे मुख्य विक्री व विपणन अधिकारी अमरनाथ दत्ता म्हणाले, “ग्राहकांची पसंती होम फ्रॅग्रन्स श्रेणीच्या विकासाला दिशा देत आहे. सुगंध हा केवळ उपयोगितेपुरता मर्यादित न राहता जीवनशैली आणि वातावरणाचा एक भाग बनत आहे. ‘अरोमा टॉवर्स’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला तीनवरून २० इन-हाऊस ब्लेंड्सपर्यंत विस्तार करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आमच्या ७७ वर्षांच्या सुगंध क्षेत्रातील अनुभवाची सांगड आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षा, नावीन्य आणि डिझाइनशी घालून अधिक मजबूत प्रीमियम उत्पादन उभारण्यावर आमचा भर आहे.”

सध्या ‘आयरिस’ची भारतातील ८,५०० हून अधिक किरकोळ विक्री केंद्रांद्वारे उत्पादने विकली जातात. २०२७ पर्यंत हा आकडा १४,००० पर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स या माध्यमातून कंपनी नियोजनबद्ध विस्तार करत आहे. केवळ विक्री केंद्रांची संख्या वाढवण्याऐवजी शाश्वत आणि फायदेशीर वितरण व्यवस्था उभारण्यावर कंपनीचा भर आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरही कंपनीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि प्रीमियम व्यावसायिक जागांसाठी स्मार्ट फ्रॅग्रन्स डिफ्यूझर मशीनमध्ये मोठी क्षमता असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गोव्यातील भक्कम पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामुळे हे राज्य ‘आयरीस’साठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. याच धर्तीवर मनाली, शिमला आणि मुन्नारसह पर्यटनावर आधारित इतर ठिकाणांमध्येही कंपनी संधींचा आढावा घेत आहे.

“गोवा आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे भक्कम पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्र आणि विकासती झाले असून प्रीमियम ग्राहकवर्गही उपलब्ध आहे. त्यामुळे हा एक उत्तम असा संगम आहे. आमच्या स्मार्ट फ्रॅग्रन्स डिफ्यूझर सोल्यूशन्सच्या माध्यमातून हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि इतर प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आस्थापनांशी अधिक दृढ संबंध निर्माण करण्याची संधी आहे. भारतातील पर्यटनावर आधारित इतर बाजारपेठांमध्येही आम्हाला अशीच क्षमता दिसते,” असे दत्ता म्हणाले.

महानगरांपलीकडे ‘आयरिस’चे लक्ष श्रेणी-२ आणि श्रेणी-३ शहरे तसेच उदयोन्मुख स्मार्ट शहरांवर आहे. वाढत्या आकांक्षा आणि बदलत्या ग्राहकवर्तनामुळे प्रीमियम लाइफस्टाइल उत्पादनांच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. वितरण, किरकोळ विस्तार आणि ब्रँड निर्मितीमध्ये बाजारपेठेच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच ‘आयरीस’च्या उत्पादनांना दीर्घकालीन आणि शाश्वत मागणी असलेल्या निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचेही कंपनी मूल्यमापन करत आहे. आयरिसच्या उत्पादनांसाठी त्या उत्तम बाजारपेठ ठरू शकतात. 

‘आयरिस’ने संस्थात्मक आणि व्यावसायिक क्षेत्रातील आपला व्यवसायही विस्तारला आहे. घरे, आदरातिथ्य, आरोग्यनिगा आणि व्यावसायिक ठिकाणांसाठी कंपनी सुगंधविषयक उपाय उपलब्ध करून देते. सिदारी रुग्णालय, कार्स 24, नायका  आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स  यांच्यासह विविध संस्थांशी कंपनीने सहकार्य केले आहे. ग्राहकांचा अनुभव, वातावरणनिर्मिती आणि ब्रँडच्या प्रतिमेत सुगंधाची वाढती भूमिका या गोष्टी यातून अधोरेखित होते.

दत्ता पुढे म्हणाले, “आमच्या पुढील टप्प्याचा केंद्रबिंदू गुणवत्तेवर आधारित विस्तार हा आहे. किरकोळ विक्रीतील उपस्थिती मजबूत करणे, हॉस्पिटॅलिटी आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विस्तार करणे आणि संतुलित विविधांगी  व्यवसाय उभारणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ग्राहक, कॉर्पोरेट आणि आदरातिथ्य क्षेत्रातील भेटवस्तू बाजारपेठ  ही आमच्यासाठी मोठी वाढीची संधी आहे. ब्रँडची गुणवत्ता आणि प्रीमियम ओळख कायम ठेवत ‘ आयरिस’चा अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

संशोधन, इन-हाऊस फ्रॅग्रन्स डेव्हलपमेंट, वितरण व्यवस्था आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून आयरिस होम फ्रॅग्रन्सेस भारतातील घरगुती आणि वातावरणनिर्मिती करणाऱ्या सुगंधी उत्पादनांच्या वाढत्या प्रीमियम बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी सज्ज होत आहे. ‘अरोमा टॉवर्स’चा विस्तार तीनवरून २० सुगंधांपर्यंत करणे हे किरकोळ विक्री, आदरातिथ्य, गिफ्टिंग आणि उदयोन्मुख ग्राहकवर्गातील कंपनीची व्याप्ती वाढवण्याच्या धोरणातील महत्त्वाचे पाऊल आहे.