Connect with us

गोवा खबर

नवहिंद टाइम्सचे विजय डीसूझा यांना सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार तर प्रुडंटच्या शिरीष कुंकळेकर यांना ग्रामीण वार्तांकन पुरस्कार

Published

on

Spread the love

गोवा राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर.

गोवा खबर:माहिती व प्रसिद्धी खात्याने पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गोवा राज्य पत्रकार पुरस्कारां’च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. ‘गोवा राज्य पत्रकार पुरस्कार’ हे मागील कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेख, वृत्त यांसाठी दहा श्रेणींमध्ये प्रदान केले जातात आणि यामध्ये प्रत्येक श्रेणीत २५,०००/- रुपयांच्या रोख पारितोषिकाव्यतिरिक्त प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाते.

यावर्षी, गोवा राज्य पत्रकार पुरस्कार योजनेअंतर्गत खालील पत्रकारांना राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत- नवहिंद टाइम्सचे श्री विजय एस. डीसूझा यांना त्यांच्या “ सेलिब्रेटिंग स्टेटहूड ” या संपादकीयासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा या विषयावरील सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तर प्रुडंट मीडियाचे श्री शिरीष कुंकळेकर यांनी त्यांच्या “ जायो, ब्लूम इन बॅटल ” या व्हिडिओ स्टोरीसाठी ग्रामीण वार्तांकन श्रेणीतील पुरस्कार पटकावला आहे .

टाइम्स ऑफ इंडियाच्या निदा सय्यद यांना गोवा सायंटिस्ट डिराईव वॉटर सोल्युबल, ओडरलेस कॉलेजन प्रॉम जेलीफिश ” या लेखासाठी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार मिळाला आहे.

प्रुडंट मीडियाचे श्री लौकिक शिलकर यांना “ भंडुरा येथे म्हादई नदीच्या पाण्याचे अवैध वळण” या व्हिडिओ रिपोर्टसाठी , महिला आणि मुले/सामाजिक समस्या या विशेष संदर्भासह सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

क्रीडा रिपोर्टिंगमध्ये, प्रुडंट मीडियाचे श्री रोहित वाडकर यांना त्यांच्या “ द लिजेंड- पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर” या वार्तांकनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कला आणि संस्कृतीवरील वार्तांकनासाठीचा पुरस्कार भांगरभुंयचे श्री समीप नार्वेकर यांना त्यांच्या “ चुडटाची शेंदरी इतिहास जमा जावपाचे वाटेर ” . या वार्तांकनासाठी मिळाला आहे.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या गौरी मळकर्णेकर यांना त्यांच्या “ रेजिंग द बार बीहाईंड बार्स वन डिग्री एट ए टाईम या शिक्षण वार्तांकनासाठी पुरस्कार मिळाला आहे .

तरुण भारतच्या श्रीमती गायत्री कुंकळेकर  यांना त्यांच्या “ गोव्यातील पहिले ‘ ॲग्री क्लिनिक ‘ सांखळीत” या सरकारी कामगिरीवरील वृत्तांकनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाचे श्री राजतिलक नाईक यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्र श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पुरस्कारांचे परीक्षक खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रकाश वझरीकर, वरिष्ठ पत्रकार, श्री किशोर शेट मांद्रेकर आणि पणजी दूरदर्शनचे माजी कार्यक्रम अधिकारी श्री उदय कामत हे होते.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातील.